शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Satara- मित्रासोबत फिरायला गेलेली तरुणी नीरा नदीत वाहून गेली, शोधमोहीम सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 12:42 IST

दुसऱ्या दिवशीही तेजलचा थांगपत्ता लागलेला नाही

शिरवळ : नीरा नदीच्या पात्रात हात-पाय धुण्यासाठी उतरलेल्या तरुणीचा तोल गेल्याने ती नदीपात्रात घसरून पडली. नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे ती वाहून गेली. ही दुर्दैवी घटना सोमवार, दि. ३ रोजी दुपारी चार वाजता हरतळी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत घडली.तेजल ऊर्फ तेजू आप्पासो साळुंखे (वय २३, रा. वरुड, ता. खटाव, जि. सातारा, सध्या रा. भोर, जि. पुणे) असे नीरा नदीपात्रात वाहून गेलेल्या तरुणीचे नाव आहे.पुणे व सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील वेलवंडी नदी व नीरा नदीच्या संगमावर भाटघर धरण आहे. धनगरवाडी हद्दीत असणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करणारी तेजल साळुंखे ही कंपनीतील मित्र दिगंबर साळेकर (रा. निगुडघर, ता. भोर, जि. पुणे) याच्यासमवेत फिरण्यासाठी आली होती. यावेळी नीरा नदीच्या पात्रात असणाऱ्या पाॅवर हाऊसमधून १६३४ क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. एका पुलाजवळ नदीपात्रात तेजल साळुंखे ही हात-पाय धुण्यासाठी उतरली. त्यावेळी पाय घसरून पाण्यात पडल्याने ती वाहून गेली. घटनास्थळी असणारा तिचा मित्र दिगंबर साळेकर याने भोर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर भोर आणि शिरवळ पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोधमोहीम राबविली; परंतु अंधार पडल्याने ती थांबविण्यात आली. दुसऱ्या दिवशी मंगळवार, दि. ४ रोजी महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड रेस्क्यू टीम, शिरवळ रेस्क्यू टीमने पुन्हा शोधमोहीम सुरू केली. दिवसभर नदीपात्रात या तिन्ही टीमनी शोध घेतला;. परंतु दुसऱ्या दिवशीही तेजलचा थांगपत्ता लागला नाही.शिरवळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नवनाथ मदने, पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई, पोलिस अंमलदार अप्पासाहेब कोलवडकर, अजित बोराटे, नितीन महांगरे, आदी शोधमोहिमेत सक्रिय आहेत.

शोधमोहीम सुरूच राहणार...हरतळी (ता. खंडाळा) या ठिकाणी तरुणी वाहून गेल्याचे समजताच पोलिस निरीक्षक नवनाथ मदने, पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांच्यासह भोरचे तहसीलदार सचिन पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. महाबळेश्वर ट्रेकर्सचे बाबा भाटिया, ऋषिकेश जाधव, नीलेश खरमरे, आऊ देशमुख, सारंग शेटे, आदींचा शोधमोहिमेत सहभाग आहे. बुधवारी तिसऱ्या दिवशीही ही शोधमोहीम सुरू ठेवली जाणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरriverनदीdrowningपाण्यात बुडणे