शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बोलत नाही म्हणून तरुणीला उचलून पायरीवर आपटलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना

By दत्ता यादव | Updated: April 18, 2023 14:24 IST

प्रकृती सुधारल्यानंतर दिली तक्रार...

सातारा : बोलत नाही याचा राग मनात धरून एका तरुणाने कापड दुकानात मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या तरुणीला उचलून पायरीवर आपटलं. त्यानंतर कपाळावर लोखंडी राॅड मारून तिच्या खुनाचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना साताऱ्यात घडली असून, याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तिघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संदेश तुकाराम गिरमे (वय २७, रा. कूस, ता. सातारा) व त्याच्यासोबत असलेला संकेत आणि धनाजी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित तरुणी २३ वर्षांची असून, ती साताऱ्यातील एका कपड्याच्या दुकानामध्ये मॅनेजर म्हणून काम करत आहे. ही तरुणी आणि तिचा मित्र दि. १६ रोजी रात्री साडेदहा वाजता एका अपार्टमेंटच्या तळ मजल्यामध्ये बोलत थांबले होते. त्यावेळी तेथे संदेश गिरमे हा त्याच्या अन्य दोन मित्रांसमवेत तेथे आला. पीडित तरुणीने त्याच्यासोबत बोलणे बंद केले होते. याचा राग मनात धरून त्याने काही एक न बोलता अचानकपणे तरुणीला पकडून जोराने बाजूला ढकलले. त्यानंतर त्याने पीडितेच्या कानाखाली आणि नाकावर बुक्की मारली. यामुळे तिच्या नाकातून जखम होऊन रक्त येऊ लागले. एवढेच नव्हे तर संदेश गिरमे याने तरुणीच्या छातीवर लाथा मारून तिला उचलून पायरीवर आपटले. ‘तुला आता जिवे मारूनच टाकतो,’ असे म्हणत जवळ पडलेला लोखंडी राॅड तिच्या कपाळावर आणि डोक्यात पाठीमागून मारला. यामध्ये पीडित तरुणी गंभीर जखमी झाली. 

हा वाद सोडविण्यास मध्यस्थी झालेल्या पीडित तरुणीच्या मित्रालाही तिघांनी बेदम मारहाण केली. जखमी तरुणीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती सुधारल्यानंतर तिने सोमवारी रात्री पावणेबारा वाजता शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी संदेश गिरमे याच्यासह त्याच्या दोन मित्रांवर खुनाचा प्रयत्न करणे तसेच विनयभंग, संगनमत करून मारहाण करणे आदी कलमांन्वये गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक बशीर मुल्ला हे अधिक तपास करीत आहेत.

प्रकृती सुधारल्यानंतर दिली तक्रार...पीडित तरुणीच्या कपाळावर आणि डोक्यात खोलवर जखमा झाल्या होत्या. डाॅक्टरांनी शस्त्रक्रिया केल्यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी फरार झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस