शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Satara: रंगपंचमी खेळताना युवती बुडाली, दोन युवकांना वाचविण्यात यश; टेंभूतील घटना 

By संजय पाटील | Updated: March 19, 2025 15:50 IST

कऱ्हाड : टेंभू, ता. कऱ्हाड येथे कृष्णा नदीवर असलेल्या प्रकल्पानजीक बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मित्र-मैत्रीणींसोबत रंगपंचमी खेळताना दोन ...

कऱ्हाड : टेंभू, ता. कऱ्हाड येथे कृष्णा नदीवर असलेल्या प्रकल्पानजीक बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मित्र-मैत्रीणींसोबत रंगपंचमी खेळताना दोन युवक व एक युवती प्रकल्पाच्या पाण्यात पडले. त्यापैकी दोन युवकांना वाचविण्यात यश आले असून युवती प्रकल्पाच्या पाण्यात वाहून गेली आहे. पोलिसांसह परिसरातील ग्रामस्थ प्रकल्पाच्या पाण्यात बुडालेल्या युवतीचा शोध घेत आहेत.जुही घोरपडे (रा. कऱ्हाड) असे प्रकल्पात बुडालेल्या युवतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेंभू येथील प्रकल्पानजीक बुधवारी दुपारी काही युवक व युवती रंगपंचमी खेळत होते. एकमेकांना रंग लावण्यासह पाणी उडविण्यात सर्वजण दंग असताना अचानक दोन युवक व जुही घोरपडे यांचा पाय घसरून ते प्रकल्पाच्या पाण्यात पडले. सोबत असलेल्या युवकांनी दोन युवकांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत जुही घोरपडे प्रकल्पाच्या पाण्यात वाहून गेली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी, उपनिरीक्षक भैरव कांबळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारीही त्याठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी पाणबुड्यांच्या मदतीने प्रकल्पाच्या पाण्यात जुही घोरपडे हिचा शोध सुरू केला आहे. सायंकाळपर्यंत ही शोधमोहिम सुरू होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यूKaradकराड