कराड (जि. सातारा) : कराड-पाटण राज्य मार्गावर विजयनगर गावच्या हद्दीत एका युवतीने रस्त्यावरच धिंगाणा घातला. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेने रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या सर्व प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड-पाटण राज्य मार्गावर रात्री आठच्या सुमारास एका युवतीने विजयनगर येथील एमएससीबी चौकात धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्या अडवत त्या वाहनांच्या बोनेटवर बसून ती आरडाओरडा करीत होती. काही वाहनांवर तिने दगडफेक केल्याचेही उपस्थित नागरिकांकडून समजले. काही नागरिकांनी या घटनेची माहिती शहर पोलिसांना कळविल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चाैकशी केली असता संबंधित युवती मनोरुग्ण असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी तिच्या घरच्यांना बोलावून युवतीला त्यांच्या ताब्यात दिले.
Web Summary : A woman created chaos in Satara, blocking traffic and climbing onto car hoods. Reportedly mentally ill, she caused temporary traffic disruptions before police intervention and handover to her family.
Web Summary : सतारा में एक युवती ने यातायात बाधित किया और कारों के बोनट पर चढ़कर हंगामा किया। बताया जा रहा है कि मानसिक रूप से बीमार होने के कारण उसने अस्थायी रूप से यातायात बाधित किया, जिसके बाद पुलिस ने हस्तक्षेप करके उसे परिवार को सौंप दिया।