शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: दोन वेळा उचकी लागली अन् तरुणाचा जीव गेला!; मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी जमले होते एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 19:16 IST

मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समोर आले नाही

सातारा : मित्राच्या वाढदिवसाचे जेवण बनविण्यासाठी कांदा कापत असताना अचानक ३० वर्षांच्या तरुणाला दोन वेळा उचकी लागली अन् यातच त्याचा जीव गेला. ही घटना मंगळवाली (दि. १७) सायंकाळी आंबेदरे (ता. सातारा) येथील स्वामी समर्थ मंदिराच्या समोरील टेकडीवर घडली.अक्षय दत्तात्रय सुतार (वय ३०, रा. आकाशवाणी केंद्राजवळ, सातारा) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मित्राच्या वाढदिवसानिमित्त अक्षय सुतारसह चार-पाच मित्रांनी आंबेदरे येथील टेकडीवर पार्टीसाठी गेले होते. तेथे अक्षय हा कांदा कापत होता. त्यावेळी त्याला अचानक दोन वेळा उचकी लागली. त्यानंतर तो बेशुद्ध पडला. त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने शाहूपुरी येथील एका खासगी दवाखान्यात दाखल केले. तेथून सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केल्याने मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समोर आले नाही. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.