शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कृष्णा नदीवरील पुलावरून आत्महत्येचा प्रयत्न; युवक, शिक्षकाने वाचवले महिलेचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 16:04 IST

कऱ्हाड : कऱ्हाड-विटा मार्गावरील कृष्णा नदीवरील पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला युवक आणि शिक्षकाच्या प्रसंगावधानाने वाचविण्यात ...

कऱ्हाड : कऱ्हाड-विटा मार्गावरील कृष्णा नदीवरील पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला युवक आणि शिक्षकाच्या प्रसंगावधानाने वाचविण्यात यश आले. संबंधित महिला पाटण तालुक्यातील असून तिला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.कऱ्हाड-विटा मार्गावरील कृष्णा नदीवरील पुलावर सातत्याने वर्दळ असते. दोन दिवसांपूर्वी दुपारी कडक उन्हामुळे पुलावर वर्दळ कमी होती. दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास एक महिला कृष्णा पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या तयारीत होती. त्यावेळी कऱ्हाडातील राजू बोडरे हे शिक्षक कृष्णा कॅनाॅलवरून कऱ्हाडकडे येत होते. त्याचबरोबर शुक्रवार पेठेतील युवक रतीश शेलार हा त्याचदरम्यान पुलावरून कऱ्हाडकडे येत होता. संबंधित महिला पुलावरून उडी मारण्याच्या तयारीत असतानाच संबंधित दोघांनी त्या महिलेला धरून बाजूला घेतले. त्यांनी त्या महिलेची विचारपूस करत तिला बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित महिला पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न करत होती. अशातच वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक भोईटे हे कऱ्हाडवरून कृष्णा कॅनॉलकडे जाताना त्यांनी हा प्रकार पाहिल्यावर ते तेथेच थांबले. संबंधित महिलेची त्यांनी विचारपूस करून शहर पोलिस ठाण्यात त्याची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक भापकर यांनी शहर पोलिस ठाण्यातून कर्मचारी मोहसीन मोमीन यांना तेथे पाठवले.मोहसिन मोमीन यांनी संबंधित महिलेला ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात नेले. संबंधित महिला साताऱ्यातील रहिवाशी असल्याने कऱ्हाड पोलिस ठाण्यातून तिला पोलिस कर्मचाऱ्यांसमवेत सातारा पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडCrime Newsगुन्हेगारी