शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री जयकुमार गोरेंकडे एक कोटीची खंडणी मागणाऱ्या महिलेस रंगेहाथ पकडले, कसा रचला सापळा.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 13:09 IST

सातारा : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना तीन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेस १ कोटी रुपयांची रोकड स्वीकारताना रंगेहाथ ...

सातारा : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना तीन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेस १ कोटी रुपयांची रोकड स्वीकारताना रंगेहाथ पकडले. स्थानिक गुन्हे शाखेने महिलेच्या वकिलाच्या सातारा येथील कार्यालयात शुक्रवारी पंचांसमक्ष ही कारवाई केली. यानंतर तिला अटक करून सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर संबंधित महिलेने आक्षेपार्ह फोटो पाठविल्याचा आराेप केला होता. यामुळे अधिवेशनावेळी मोठी खळबळ उडाली होती. यानंतर हा वाद मिटविण्यासाठी संशयित महिला तीन कोटी रुपयांची मागणी गोरे यांच्याकडे करत होती. महिलेने आपल्या वकिलामार्फत मंत्री गोरे यांचे मित्र विराज शिंदे (रा. वाई) यांच्याकडे ही मागणी केली होती. त्यानंतर मंत्री गोरे यांनी याविरोधात लेखी तक्रार दिली होती. तक्रारीची शहानिशा करून पुढील कारवाईसाठी तक्रारदार विराज शिंदे हे दि. १७ रोजी स्थानिक गुन्हे शाखेत आले होते. यावेळी विराज शिंदे यांनी पोलिसांना सांगितले की, संशयित महिला दि. १७ रोजी राजभवन येथे उपोषणाला न बसण्यासाठी लोकप्रतिनिधींकडे ३ कोटी खंडणीची मागणी वकिलामार्फत करत आहे. रक्कम न दिल्यास गोरे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करत बदनामी करून मंत्रिपद घालवणार आहे. ते एका अपघातातून बचावले आहेत, आता जिवंत राहणार नाहीत, अशी धमकी दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तक्रारीची खात्री करण्याकरिता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करून व्हाइस रेकॉर्डर प्राप्त करून घेतला. दोन शासकीय पंचांसह दि. १७ व दि. १९ रोजी तक्रारदार व संबंधित महिला व वकिलाशी चर्चा झाली. तक्रारदार महिला ३ कोटी दोन टप्प्यांत रोख मागत असल्याचे व्हाइस रेकॉर्डवरील संभाषणावरून निष्पन्न झाले. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून महिलेस रंगेहाथ पकडले. तिच्याविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, तिला अटक केली आहे.पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के व पथकाने ही कारवाई केली.

असा रचला सापळा

  • तक्रारदार असलेले विराज शिंदे व मंत्री गोरे खंडणीची रक्कम जास्त व रोख देण्याची असल्याने मित्रांकडून गोळा करण्याकरिता दोन दिवसांचा वेळ मागितला.
  • दि. २१ रोजी तक्रारदारांनी १ कोटी रोख स्वरूपात जुळवाजुळव करून सातारा स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात आले.
  • संबंधित महिलेच्या वकिलांनी तक्रारदार रोकड घेऊन येत असल्याचे सांगितले असता, महिलेने रक्कम वकिलाच्या ऑफिसमध्ये घेऊन येण्यास सांगितले.
  • संबंधित महिला त्या ठिकाणी आली. तक्रारदारांनी शासकीय पंचांसमक्ष वकिलाच्या ऑफिसमध्ये संबंधित महिलेने १ कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताच पोलिस पथकाने रंगेहाथ पकडले.

काय आहे प्रकरण?मंत्री जयकुमार गोरे यांनी महिलेस आक्षेपार्ह फोटो पाठविल्याचा आरोप संबंधित महिलेने केला होता. यावरून विरोधकांनीही मंत्री गोरे आणि राज्य सरकारला धारेवर धरत राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, जयकुमार गोरे यांनी हे जुने प्रकरण असून, कोर्टाने आपल्याला निर्दोष मुक्त केल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले होते.आणखी एक संशयित ताब्यातयाप्रकरणी शिंदेसेनेचे पदाधिकारी अनिल सुभेदार या आणखी एका संशयितास अटक करण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरJaykumar Goreजयकुमार गोरेWomenमहिलाPoliceपोलिस