शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरमधील केट्स पॉईंटवरुन गुजरातच्या पर्यटकाची आत्महत्या, सुमारे अडीचशे फूट दरीत उडी मारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 13:12 IST

महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या केट्स पॉईंटवरून गुजरात येथील पर्यटकाने बुधवारी रात्री सातच्या सुमारास सुमारे ...

महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या केट्स पॉईंटवरून गुजरात येथील पर्यटकाने बुधवारी रात्री सातच्या सुमारास सुमारे अडीचशे फूट दरीत उडी मारून आत्महत्या केली. गुरुवारी दुपारी मृतदेह बाहेर काढण्यात आला.दरम्यान, मृतदेहाशेजारी सापडलेल्या आधार कार्डवर अनिल अग्रवाल (वय ६६, रा. आत्माराम अग्रवाल सी/८०१, एकता अनुवऐ बी/एच एकता टॉवर वसना बर्रागे रोहद वसना अहमदाबाद, पालडी, गुजरात) असा उल्लेख आहे.याबाबत पाचगणी पोलिस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, केटस पॉईंट, महाबळेश्वर येथील निडल होल येथील कड्यावरून बुधवार, दि. २४ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास एका अनोळखी पुरूषाने उंचीवरून उडी मारून आत्महत्या केली असल्याची माहिती मिळाली. मात्र रात्री अंधार पडलेला असल्यामुळे महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी गुरुवारी सकाळी कड्यात उतरण्याचा निर्णय घेतला. सकाळी महाबळेश्वर ट्रेकर्सला एक मृतदेह आढळून आला. मृत्यू प्रकरणातील अनोळखी मृतदेहाची व त्याच्या नातेवाईकांची शोध मोहीम पाचगणी पोलिस ठाण्यातून सुरू आहे. आत्महत्या केलेल्याचे वय अंदाजे ६६ असून अर्धवट टक्कल असून पांढरे केस आहेत. अंगात निळ्या रंगाची जिन्स पँट, उजव्या हातात लाल रंगाचा धागा आहे. तरी अशा वर्णनाच्या इसमाबाबत काही उपयुक्त माहिती असल्यास पाचगणी पोलिस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार नीलेश माने तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानCrime Newsगुन्हेगारी