शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

दिवशी घाटात वीज अंगावर पडल्याने शिक्षकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 23:26 IST

दुपारी चार वाजता ते दिवशी घाटात जुळेवाडी स्टॉपच्या थोडेसे पुढे आले. यावेळी जोराच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस सुरू झाला होता. यावेळी त्यांचा मृत्यू झाला.

सणबूर : पाटण तालुक्यातील दिवशी घाटात जुळेवाडी स्टॉपपासून ढेबेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या पावसात संतोष शंकरराव यादव (वय ४०) या शिक्षकाच्या अंगावर वीज पडली. यात त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी कऱ्हाडला पाठविला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.

याबाबत माहिती अशी की, संतोष यादव हे ढेबेवाडी विभागातील डोंगर पठारावरील कसणी येथील प्राथमिक शाळेत शिक्षक होते. बुधवारी शालेय पोषण आहारचे ऑडिट करण्यासाठी पाटण येथे गेले होते. काम संपवून ते दुपारी निघाले. दुपारी चार वाजता ते दिवशी घाटात जुळेवाडी स्टॉपच्या थोडेसे पुढे आले. यावेळी जोराच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस सुरू झाला होता. यावेळी त्यांचा मृत्यू झाला.

या धक्कादायक प्रसंगाने शोककळा पसरली आहे. संतोष यादव हे २०१८ पासून ढेबेवाडी विभागात नोकरी करीत होते. ते मूळचे वाई तालुक्यातील असून त्यांची नुकतीच वाई तालुक्यात बदली झाली होती. ते त्यांच्या गावापासूनच्या जवळच्या शाळेत जाणार होते. तोच त्यांच्यावर काळाचा घाला घातला आहे. एक चांगला शिक्षक गेल्याने प्राथमिक शिक्षक वर्गात शोककळा पसरली आहे.यावेळी प्रदीप घाडगे, राजू पवार, रामभाऊ, नाना कदम या शिक्षकांसह अनेक शिक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. ढेबेवाडीचे सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत चौधरी यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन मृतदेह कऱ्हाड येथे शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDeathमृत्यू