किल्ले अजिंक्यतारावरून कोसळला दगड; झाडांची पडझड : दरीमुळे दुर्घटना टळली
By सचिन काकडे | Updated: September 24, 2023 18:50 IST2023-09-24T18:50:34+5:302023-09-24T18:50:59+5:30
हा दगड दरीत कोसळल्याने मोठा अनर्थ टळला.

किल्ले अजिंक्यतारावरून कोसळला दगड; झाडांची पडझड : दरीमुळे दुर्घटना टळली
सातारा : किल्ले अजिंक्यतारावरून रविवारी दुपारी एक महाकाय दगड घरांच्या दिशेने कोसळला. उंचावरून आलेल्या या दगडाचा वेग अधिक असल्याने डोंगर उतारावरील दोन झाडे उन्मळून पडली. हा दगड दरीत कोसळल्याने मोठा अनर्थ टळला.
अजिंक्यतारा किल्ल्यावर अनेक महाकाय दगड धोकादायक स्थितीत उभे आहेत. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, हे दगड वसाहतींच्या दिशेने कोसळण्याचा धोका निर्माण होतो. यापूर्वीही असे मोठाले दगड घरांवर आदळून प्रचंड नुकसान झाले आहे. रविवारी दुपारी एक भला मोठा दगड किल्ल्यावरून वसाहतींच्या दिशेने कोसळला.
हा दगड दरीत कोसळल्याने धोका टाळला असला, तरी दगडाचा वेग अधिक असल्याने, एक झाड बुंध्यासह उन्मळून पडले, तर दुसरे झाडही जमीनदोस्त झाले. पाणीपुरवठ्याचा व्हाॅल्व्ह सोडण्यासाठी येणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांमुळे ही घटना उघडकीस आली.