शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरमध्ये साकारणार किल्ले 'अजिंक्यतारा'ची प्रतिकृती

By सचिन काकडे | Updated: October 7, 2023 18:44 IST

सातारा : किल्ले अजिंक्यतारा हा कायम अजिंक्य, अभेद्य असा राहिला आहे. या किल्याची आजही इतिहासप्रेमी गडप्रेमींना भुरळ असते. शनिवारी ...

सातारा : किल्ले अजिंक्यतारा हा कायम अजिंक्य, अभेद्य असा राहिला आहे. या किल्याची आजही इतिहासप्रेमी गडप्रेमींना भुरळ असते. शनिवारी नागपूर येथील शिवदुर्ग प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी किल्ले अजिंक्यताऱ्याला भेट दिली. नागपूर येथे दिवाळीनिमित्त किल्ल्यांची प्रतिकृती बनवण्याची स्पर्धा दरवर्षी घेतली जाते. या निमित्ताने शिव गौरव या प्रतिष्ठानच्या वतीने यंदा स्वराज्याच्या चौथ्या राजधानीचा मान मिळविणाऱ्या किल्ले अजिंक्यताऱ्याची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी दिली.नागपूर येथील शिवदुर्ग प्रतिष्ठान गेली पंधरा वर्ष दिवाळीनिमित्ताने घेण्यात येणाऱ्या गडकिल्ले प्रतिकृती तयार करण्याच्या स्पर्धेत सहभागी होत आहे. या स्पर्धेत  त्यांनी रायगड, तोरणा, राजगड, जंजिरा अशा अनेक किल्यांच्या प्रतिकृती साकारल्या होत्या. यावर्षी प्रथमच ते  किल्ले अजिंक्यतारा या किल्याची प्रतिकृती साकारणार आहेत. शिवदुर्ग प्रतिष्ठानचे रोहित लाड, पीयूष भराटे, संजय नांदुरकर, अमय महाडिक, आदित्य खंडागळे, नितीन येरंडे यांनी किल्ले अजिंक्यताराची शनिवारी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांचे स्वागत उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी केले. यावेळी जिज्ञासा मंचचे निलेश पंडित उपस्थित होते. होते. गडावरचा मुख्य दरवाजा, दक्षिण दरवाजा, गडावरील कोठार, राजसदर, महादेव मंदिर, मंगळाई मंदिर, कैद खाना याची सविस्तर माहिती त्यांना प्रत्यक्ष गडावर देण्यात आली. तसेच निलेश पंडित यांनी गडाच्या इतिहास कालीन नावाचे रहस्य विशद केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFortगडnagpurनागपूर