शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात पश्चिमेकडे धबधब्यांची पर्वणी; ठोसेघर, एकीव, दुंद, भांबवली धबधबे कोसळताहेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 13:40 IST

पेट्री : पश्चिम घाटात अधूनमधून मुसळधार पाऊस चांगलाच रमला असून, दिवसभर धुक्याची दुलई पसरलेली दिसत आहे. दाट धुके अन् ...

पेट्री : पश्चिम घाटात अधूनमधून मुसळधार पाऊस चांगलाच रमला असून, दिवसभर धुक्याची दुलई पसरलेली दिसत आहे. दाट धुके अन् त्यात हरवलेल्या निसर्गरम्य डोंगरातून धबधबे कोसळत आहेत. ठोसेघर तसेच एकीव, भांबवलीपर्यंत असंख्य लहान-मोठे धबधबे मोठ्या प्रमाणावर कोसळत आहेत.सातारा-बामणोली मार्गावर आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणाऱ्या कास पठार परिसरात सध्या अधूनमधून मुसळधार पाऊस होऊन सध्या पावसाची रिमझिम सुरू आहे. तसेच बऱ्याचदा जोरदार पावसाच्या सरी पडत असल्याने छोटे-मोठे धबधबे फेसाळत आहेत.शहराच्या पश्चिमेस एकीव, दुंद, कास पठार परिसर, भांबवली येथील कित्येक धबधबे फेसाळू लागले आहेत. या धबधब्यांसमवेत अनेक पर्यटक पावसात भिजत फोटोसेशन करत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात यंदा मान्सूनने वेळेपूर्वी हजेरी लावली असली, तरी सध्या कास परिसरात अधूनमधून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. कास पठारावर कास तलावाकडे जात असताना असलेल्या वळणावर छोट्या प्रमाणात धबधबा कोसळू लागला आहे. छोटे-मोठे कोसळणारे धबधबे, चोहोबाजूला हिरवीगार दाट झाडी, पावसाच्या अधूनमधून कोसळणाऱ्या सरी, वेगाने वाहणारा वारा, त्यात सर्वत्र पसरलेले धुके डोळ्यांचे पारणे फेडत आहेत.

कण्हेर धरणाच्या पाणीपातळीत वाढ..मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने कास पठाराच्या सड्यावरून पाणी वाहू लागल्याने तलावाकडे जाणाऱ्या पठारालगत असणारा छोटा धबधबा तसेच सड्यावरून पूर्वेला वाहणाऱ्या पाण्यामुळे पारंबे फाट्यापासून उजवीकडे चार किलोमीटर अंतरावरील एकीव धबधबा कोसळत आहे. यामुळे कण्हेर धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.

भांबवलीसह कास पठार परिसरात अनेक छोटे-मोठे धबधबे दर्शन देऊ लागले आहेत. येथील दाट धुक्यात रिमझिम पडणारा पाऊस मन हेलावून टाकत आहे. - राजेंद्र मोहिते, पर्यटक, पुणे

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtourismपर्यटनRainपाऊस