रहिमतपूर : मध्यप्रदेशमधील सागर येथे कर्तव्य बजावताना साताऱ्यातील वेळूमधील जवानाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. प्रशांत मनोहर भोसले (वय ३६) असे मृत जवानाचे नाव आहे. उद्या, गुरुवार (दि,१९) त्यांचे पार्थिव वेळू गावी आणण्यात येणार आहे. त्यानंतर शासकीय इतमामात जवान प्रशांत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.वेळू गावचे सुपुत्र असलेल्या प्रशांत भोसले यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या प्रशांत यांच्या मनात देशसेवेची आस असल्याने कमी वयात ते सैन्य दलात दाखल झाले. अगदी मनमिळाऊ व्यक्तिमत्व असलेल्या प्रशांत यांच्या अचानक जाण्याने भोसले कुटुंबियांसह गावावर शोककळा पसरली आहे. जवान प्रशांत भोसले यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
मध्यप्रदेशात कर्तव्य बजावताना साताऱ्यातील वेळूमधील जवानाचे हृदयविकाराने निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 14:23 IST