शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून खामगावात घर जाळले, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 13:03 IST

फलटण : पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून खामगाव (ता. फलटण) येथील जितेंद्र विलास काळे यांचे घर जाळल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध फलटण ...

फलटण : पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून खामगाव (ता. फलटण) येथील जितेंद्र विलास काळे यांचे घर जाळल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरातील ५० हजार आणि सोन्याच्या दागिन्यांसह या जाळपोळीत काळे यांच्या घरातील सर्व सामान जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ४ मार्च २०२४ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास फिर्यादी जितेंद्र विलास काळे हे त्यांच्या पत्नीसह बाहेरगावी गेले असताना त्यांचे घर जळाल्याची माहिती समजली. ते खामगाव येथे घरी पोहोचले असता त्यांना त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. घराचे कुलूप तुटलेले होते. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता कपाटातील कपडे, रग व घरातील इतर वस्तू जळलेल्या होत्या. तसेच कपाटामध्ये असलेली १९ ग्रॅमची सोन्याची चेन व ५० हजार रुपये रोख रक्कम दिसली नाही.या जाळपोळ व चोरीप्रकरणी काळे यांनी संशयित जॉनी नंदू भोसले, सागर नंदू भोसले, हिरा शर्करा पवार, किरण पिसुरड्या शिंदे, शायर पाग्या भोसले, वर्धमान आरोग्य शिंदे (सर्व रा. साखरवाडी, ता. फलटण) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. यापूर्वी दिलेल्या तक्रारीवरून त्यांनी काळे यांना ''तक्रार मागे घे, नाहीतर तुझे घरदार जाळून टाकीन'', अशी धमकी दिली होती. काळे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत वरील सहा आरोपींवर संशय व्यक्त केला असल्याचे म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास सपोनि हजारे करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग