शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

Satara: तासवडे टोलनाक्यावर खासगी बसला लागली आग, बस जळून खाक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 13:49 IST

अजय जाधव उंब्रज: पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईकडे प्रवाशी घेऊन निघालेल्या खासगी बसला तासवडे टोलनाका येथे अचानक आग ...

अजय जाधवउंब्रज: पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईकडे प्रवाशी घेऊन निघालेल्या खासगी बसला तासवडे टोलनाका येथे अचानक आग लागली. या आगीत बस जळून खाक झाली. ही घटना तासवडे टोलनाक्यानजीक पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेत बसमधून प्रवास करणारे ५५ प्रवाशांना तासवडे टोल व्यवस्थापन, महामार्ग पेट्रोलिंग कर्मचारी व तळबीड पोलिस ठाण्याचे कर्मचारी यांनी प्रसंगावधान दाखवत बस मधून बाहेर काढून वाचवले. या घटनेत बसचे अंदाजे २० लाख रुपयांचे नुकसान झाले तर प्रवाशांचे प्रवासी बँगेतील साहित्य जळून खाक झाले. याबाबत मिळालेली माहिती अशी, डाँल्फीन कंपनीची खासगी प्रवासी वाहतूक बस (क्रमांक- एम.एच. ०३-सी.पी. ४५००) ही रात्री प्रवासी घेऊन मिरजहून मुंबईकडे निघाली होती. ही बस पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरुन मुंबईकडे जात असताना पहाटेच्या सुमारास ही बस कराड तालुक्यातील तासवडे टोलनाक्यानजीक आल्यानंतर या बसला पाठीमागील बाजूस आग लागली. पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या बसच्या चालकाने आग लागल्याची माहिती चालकाला दिली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान, तासवडे टोल कर्मचारी, महामार्ग पेट्रोलिंग विभागाचे कर्मचारी व तळबीड पोलिस ठाण्याचे कर्मचारी यांनी तात्काळ प्रसंगावधान राखून गाडीतील प्रवाशांना खाली उतरले व नजीकच्या अग्निशामक दलाशी संपर्क साधला. त्यानंतर काहीवेळात कराड नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानानी घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आली. आगीत बसचे सुमारे वीस लाख रुपये तर प्रवाशांच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआगtollplazaटोलनाका