शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Satara: वर्ये रामनगर येथे प्लायवूड दरवाजा कंपनीला भीषण आग, कोट्यवधीचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 15:30 IST

सहा तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश

गुलाब पठाण

किडगाव : सातारा तालुक्यातील वर्ये रामनगर येथील ओसवाल डोअर नावाची कंपनी आहे. या कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक आग लागली. यामुळे कोट्यवधी रुपयांचे दरवाजे व इतर साहित्य जळून खाक झाले. सहा तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.रामनगर येथे ही कंपनी गेले कित्येक दिवसांपासून सुरू आहे. या ठिकाणी घराला लागणारे प्लायवूड दरवाजे बनवले जातात. या कंपनीचे मालक समोलचंद जमनालाल ओसवाल व सतीश ओसवाल हे आहेत. या ठिकाणी घरांना लागणारे दरवाजे बनवून विकले जातात. मंगळवारी सकाळी या कंपनीला आग लागली. त्यामुळे भले मोठे धुराचे लोट परिसरामध्ये दिसू लागले.आगीची बातमी मिळताच सातारा नगरपालिकेचे दोन अग्निशामक बंब तसेच शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व सातारा औद्योगिक वसाहतीतील कूपर कंपनीचे अग्निशामक बंब या ठिकाणी दाखल झाले. सुमारे पाच अग्निशामक बंब व दहा पाण्याच्या टँकरने ही आग सकाळी ८ वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत विझवण्याचे काम सुरू होते.या कंपनीला लागलेल्या आगीमुळे कंपनी मालकाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. ही आग कशामुळे लागली हे मात्र अद्यापही समजू शकले नाहीत. अग्निशमन दल याचा शोध घेत आहेत. या कंपनीच्या शेजारी असणाऱ्या राहत्या घरालाही याची झळ पोचली असून, त्या घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.ही आग इतकी प्रचंड होती की आग चार तासांहून जास्त काळ धुमसत होती. आगीच्या ज्वालामुळे पत्रा व लोखंडी अँगल अक्षरशः वाकून गेले आहेत. आतमध्ये लाकडी साहित्य व रसायन असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. पाण्याचा मारा केल्यामुळे आग आटोक्यात येत होती मात्र लाकडी साहित्य असल्याने ही आग दुमसत परत वाढत होती.

परिसरातील रामनगर, वर्ये पानमळेवाडी येथील नागरिकांनी आग विझवण्यासाठी मदत केली. सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. आग कशामुळे लागली हे मात्र अद्यापही स्पष्ट झाले नाही. कंपनीचे मालक ओसवाल हे हताशपणे आग विझवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग