शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

धक्कादायक! आई-वडिलांवरचा राग काढला भावाच्या मुलावर, एक वर्षाच्या चिमुकल्याला फेकलं विहिरीत

By दत्ता यादव | Updated: August 6, 2022 19:17 IST

चॉकलेट देण्याच्या बहाण्याने त्याच्या सख्या थोरल्या भावाचा मुलगा शलमोनला घरातून नेले. अन् चिमुकल्याला विहीरीत फेकून दिले.

सातारा : शहराचे उपनगर असलेल्या दत्तनगर कोडोली येथे अष्टविनायक कॉलनीमध्ये घरगुती वादातून सख्या चुलत्याने एक वर्षाच्या चिमुकल्याला विहीरीत टाकून त्याचा खून केला. ही धक्कादायक घटना आज, शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. शलमोन मयूर सोनवणे असे या खून झालेल्या दुर्देवी बाळाचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अक्षय मारूती सोनवणे (वय २३) याने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने त्याच्या सख्या थोरल्या भावाचा मुलगा शलमोनला आज, शनिवारी सकाळी घरातून नेले. सातारा एमआयडीसी कॅनॉलजवळ असलेल्या दत्तनगर येथील विहीरीत त्याला फेकून दिले. घरातल्यांनी शलमोनचा शोध घेतला असता तो कुठेही सापडला नाही. सरतेशेवटी कॉलनीतीलच एकाला शलमोन विहीरीत असल्याचे दिसले. त्यानंतर सातारा शहर पोलीस आणि नागरिकांनी शलमोनला विहीरीतून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.या प्रकारानंतर घरातल्यांनी माहिती घेतली असता हे घृणास्पद कृत्य त्याचा चुलता अक्षय सोनवणे याने केले असल्याचे समोर आले. कोवळ्या मुलाचा अत्यंत निर्दयपणे त्याने खून केल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी अक्षय सोनवणे याला काही तासांत अटक केली. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबुलीही दिली.मनात राग धरून केलं कृत्यमाझे आई-वडील माझा सख्खा भाऊ मयूर सोनवणे याच्याकडेच जास्त लक्ष देतात आणि मला नेहमी वाईट नजरेने पाहातात. याचा राग मनात धरून मी माझ्या भावाच्या मुलाला विहीरीतफेकून दिले. अशी खळबळजनक कबुलीही त्याने पोलिसांकडे दिली. अक्षय सोनावणे हा  एमआयडीसीमध्ये एका कंपनीत काम करतो. तोविवाहित असून, केवळ कुटुंबातील द्वेषापोटी त्याने कोवळ्या मुलाचा जीव घेतल्याने कोडोली परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे हे अधिक तपास करीत आहेत.मनातील खदखद जीवघेणी..अक्षय सोनवणे हा स्वभावाने तापटच. धरसोड वृत्तीमुळे त्याने अनेक ठिकाणी काम केले. त्यामुळे घरातले त्याला फारशी किंमत देत नसत, असा त्याचा समज असायचा. त्यातच आर्इ वडील नेहमी मोठ्या भावाची बाजू घ्यायचे. याची त्याच्या मनात खदखद होती. त्यामुळेच त्याने भावाच्या मुलाचा निदर्यपणे खून केला. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस