शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

चौथ्या महिला धोरणाची प्रत शिवरायांच्या चरणी अर्पण!, किल्ले प्रतापगडावर अवतरला शिवकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 19:18 IST

काठीवर चालणारी मुले, आई भवानीमातेचा व शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या घोषणा यासह ढोल पथक, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला.

महाबळेश्वर : किल्ले प्रतापगड शिवजयंतीचे औचित्य साधून चौथ्या महिला धोरणाची प्रत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करत अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीने महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंतीचे आयोजन केले होते.सूर्योदयाच्या साक्षीने मंगलमय वातावरणात सुरुवात झालेल्या सोहळ्याने वातावरण भारून गेले होते. मंत्री यशोमती ठाकूर व जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते भवानी मातेला महाअभिषेक तसेच यांच्या हस्ते भवानी मातेची मनोभावे महाआरती करण्यात आली. भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून भगव्या ध्वजाचे रोहण करण्यात आले. यावेळी ढोल पथक, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला.प्रतापगड ग्रामस्थ व संयुक्त वनव्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शिवभक्तांना अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. मानाच्या पालखीची पूजा झाल्यानंतर छत्रपतींची मूर्ती असलेल्या पालखीचे वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. काठीवर चालणारी मुले, आई भवानीमातेचा व शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या घोषणांनी मिरवणूक दुमदुमून गेली.अश्वारूढ पुतळ्याजवळ शिवरायांच्या पालखीचे आगमन झाल्यावर मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पुष्पार्पण करून पूजन करण्यात आले. ‘क्षत्रिय कुलावंतस राजाधिराज...’या ललकारीने अन् शिवरायांच्या जयजयकाराने प्रतापगडावर शिवकाळ अवतरल्याची प्रचीती आली. शिवपुतळ्यावरील ध्वजस्तंभावर मान्यवरांच्या हस्ते भगव्याचे ध्वजारोहण करण्यात आले. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.बांबूच्या साह्याने सर केला किल्ले प्रतापगडशिवरायांच्या अतुलनीय पराक्रमाचा साक्षीदार असणाऱ्या किल्ले प्रतापगडावर त्याच्याच पायथ्याला असणाऱ्या जावळी प्राथमिक शाळेच्या लहान मावळ्यांनी बांबूच्या साह्याने गड सर केला. दोन्ही पायांत काठी पकडून त्याच्या साह्याने जमिनीपासून सुमारे चार ते पाच फूट उंच असून त्यांनी नृत्य सादर केले. हे अनोखे चित्तथरारक नृत्य पाहताना मंत्री यशोमती ठाकूर यांनी आश्चर्य व्यक्त करत विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPratapgad Fortप्रतापगड किल्लाShivjayantiशिवजयंती