शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडच्या महाविद्यालयीन तरूणाची साताऱ्यात आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

By दत्ता यादव | Updated: February 11, 2023 19:13 IST

सातारा : शहर परिसरातील एका महाविद्यालयात एमफाॅर्मचे शिक्षण घेणाऱ्या प्रशांत हवगीराव मारफळे (वय २३, रा. मुखेड, जि. नांदेड) याने साताऱ्यात गळफास ...

सातारा : शहर परिसरातील एका महाविद्यालयात एमफाॅर्मचे शिक्षण घेणाऱ्या प्रशांत हवगीराव मारफळे (वय २३, रा. मुखेड, जि. नांदेड) याने साताऱ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार, दि. १० रोजी सायंकाळी साडेपाच वाजता उघडकीस आली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रशांत मारफळे याने गेल्या पंधरा दिवसांपूर्वी साताऱ्यातील एका महाविद्यालयात एमफाॅर्मलाप्रवेश घेतला होता. त्यातील केवळ दोन दिवस तो काॅलेजला गेला. वाढे फाटा परिसरातील साई निवारा या इमारतीमधील फ्लॅटमध्ये तो मित्रासमवेत भाड्याने खोली घेऊन राहात होता. शुक्रवारी दुपारी तो काॅलेजला गेला नाही. त्याचा रुमपार्टनर प्रथमेश चाैधरी (२४, रा. डाळमोडी, पो बोंबाळे, ता. खटाव, जि. सातारा) हा काॅलेजला गेला होता. सायंकाळी साडेपाच वाजता तो रुमवर आला. त्याने दरवाजा वाजविला असता आतून त्याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. प्रशांत झोपला असेल, असे समजून त्याचा मित्र थोडा वेळ बाहेरच थांबला. त्यानंतर त्याने पुन्हा दरवाजा वाजविला. मात्र, तरी सुद्धा आतून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने इमारतीमधील अन्य काही जणांना याची माहिती दिली. ते लोकही त्याच्या मदतीला आले. शेवटी याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस आल्यानंतर त्यांनी दरवाजाची कडी तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी प्रशांत मारफळे याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.या प्रकाराची माहिती पोलिसांनी त्याच्या घरी दिल्यानंतर त्याचे वडील आणि भाऊ नांदेडहून शनिवारी सकाळी साताऱ्यात आले. पोलिसांनी खोलीची पूर्णपणे झडती घेतली. मात्र, चिठ्ठी अथवा संशयास्पद काहीही सापडले नाही. त्यामुळे त्याने टोकाचे पाऊल का उचलले, हे पोलिसांना अद्याप समजले नाही. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, हवालदार राजेंद्र तोरडमल हे अधिक तपास करीत आहेत. तो चिंतेत होता...साताऱ्यात शिक्षणासाठी आल्यानंतर प्रशांत अत्यंत चिंतेत होता. फारसा कोणाशी बोलायचाही नाही. त्याने कोणत्या प्रकारचे टेन्शन घेतले होते. हे त्याच्या घरातल्यांनाही माहिती नाही. पोलिसांनी त्याचा मोबाइल ताब्यात घेतला असून, याद्वारे आत्महत्येमागच कारण काही मिळतेय का, हे पोलिस तपासत आहेत.   

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस