शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: उभ्या कारवर उसाने भरलेला मालट्रक पलटी, नाल्याच्या कठड्यामुळे दांपत्याचे वाचले प्राण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 12:45 IST

वेळ आली होती, पण काळ आला नव्हता

मलकापूर : देवदर्शनासाठी निघालेल्या महामार्गाच्या कडेला उभ्या कारवर उसाने भरलेला मालट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नवीन निर्माण झालेल्या नाल्याच्या कठड्यामुळे दोन सैनिक दांपत्याचे प्राण वाचले आहेत. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नांदलापूर हद्दीत अकॅडमिक हाइट पब्लिक स्कूल समोर झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दोन सैनिक दाम्पत्य आणि कार चालक असे पाच जण (एमएच १२ वायएफ ८७२०)मधून मिलिटरी अपसिंगे (ता. सातारा) येथून देवदर्शनासाठी कोल्हापूरला निघाले होते. पुणे-बंगळुरू महामार्गावर पहाटे चारच्या सुमारास नांदलापूर येथील अकॅडमिक हाइट पब्लिक स्कूल समोर आले असता चालकाने कार महामार्गाच्या कडेला थांबवली. काही वेळातच पाठीमागून ऊस भरलेला मालट्रक (एमएच ४५ ०८३३) हा भरधाव वेगात येऊन कारवर पलटी झाला.या अपघातात सैनिक दाम्पत्यांसह चालक किरकोळ जखमी झाला आहे. मात्र, कारसह मालट्रक व उसाच्या मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उसाच्या मालासह मालट्रक कारवर पलटी झाला मात्र महामार्गालगत नवीन नाला बांधला आहे. यामुळे मालट्रक व ऊस नाल्यावर पडल्यामुळे व मालट्रकचा पुढील भाग कारच्या बॉनेटवर टेकला. यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघाताची माहिती मिळताच माहामार्ग देखभाल विभागातील क्रेनचे कर्मचारी सुनील कदम, राहुल कदम यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.नागरिकांसह वाहनधारकांच्या मदतीने व कदम क्रेनच्या साहाय्याने उसाचा माल बाजूला केला. उसाचा माल बाजूला करत कारमधील पाच जणांना सुखरूप बाहेर काढले. अपघाताची माहिती शहर व महामार्ग पोलिसांना दिली. माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसह कऱ्हाड शहरचे पोलिस कर्मचारी अपघातस्थळी दाखल झाले. अपघातस्थळाचा पंचनामा करून व उसाचा माल दुसऱ्या वाहनात भरून सकाळी दहा वाजेच्या सुमारास अपघातग्रस्त वाहने बाजूला केली.

वेळ आली होती, पण काळ आला नव्हतानांदलापूर हद्दीत पहाटे उसाचा ट्रक कारवर पलटी झाला. मात्र, मालट्रक कारच्या बॉनेटवर टेकला, तर नवीन बनवलेल्या नाल्यावर उसाचा माल टेकल्यामुळे कारमधील पाचही जणांना किरकोळ दुखापत झाली. हाच ट्रक व ऊस कारच्या मधोमध पडाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. या घटनेत काळ आला होता, पण सुदैवाने वेळच आली नव्हती म्हणून सर्व जण सुखरूप बाहेर आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात