शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Satara: कऱ्हाडात ‘कार’नामा; सात वाहनांना उडवले, सहा जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 14:03 IST

चालक महिला की पुरुष, गोंधळाचे वातावरण

कऱ्हाड : येथील विद्यानगर, कृष्णा कालव्याकडून कऱ्हाड शहरात जाणाऱ्या कारने अवघ्या तीनशे मिटर अंतरात सात वाहनांना उडवले. ही थरारक घटना शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. या अपघातात कारसह चार दुचाकी, दोन रिक्षा व एका कारचे मोठे नुकसान झाले. सहा जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अपघातप्रकरणी चालक संजय सर्जेराव पवार (वय ६३ रा. शिवाजी हौसिंग सोसायटी, कऱ्हाड) याला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

संजय पवार, सुषमा पवार यांच्यासह रफिक मुजावर (३४ रा. चौंडेश्वरी नगर), विशाल उथळे (२२), कल्याण बेडके (३४, रा. सैदापूर), समीर चौधरी (२६, रा.सातारा), शिवानी भोसले (रा. खोडशी) अशी जखमींची नावे आहेत.संजय पवार व पत्नी सुषमा हे शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास कारने कृष्णा कॅनॉल बाजूकडून कऱ्हाड शहरात येत होते. कालव्या पुढच्या बाजूला कारने प्रथम रिक्षाला धडक दिली. यानंतर एका दुचाकीला धडक दिली. कृष्णा पुलावरून शहरात आल्यावर कारने बालाजी हॉस्पिटलजवळ कारला जोराची धडक दिली. तेथेच उभ्या एका दुचाकीला धडक देऊन कारने बालाजी हॉस्पिटल समोर उभा असलेल्या रिक्षा व दोन दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवर रिक्षा पलटी झाली. रिक्षावर कारही पलटी झाली. कारच्या धडकेने बालाजी हॉस्पिटलजवळ असलेले एक झाड पडले आहे. अपघातानंतर नागरीकांनी पलटी झालेली कार सरळ करून त्यातील महिला व नागरिकांना बाहेर काढून खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.दरम्यान, कृष्णा कालव्यापासून रस्त्यात दिसेल त्या वाहनाला धडक देत शहरात आलेल्या कारमुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. हॉस्पिटलसमोर दोन कार अन् तीन अपघातग्रस्त दुचाकी पडल्या होत्या. वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघात विभागाचे पोलिस घटनस्थळी दाखल झाल्यानंतर वाहतूक सुरळीत केली. सर्व अपघातग्रस्त वाहने कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात आणली.

चालक महिला की पुरुषकृष्णा कालव्यापासून रस्त्यात दिसेल त्या वाहनाला धडक देत निघालेल्या कारचा अनेक वाहनचालकांनी पाठलाग केला. अखेर बालाजी हॉस्पिटलजवळ एक रिक्षा, कार व तीन दुचाकींना धडक दिल्यानंतर ती पलटी झाली. यावेळी अपघतग्रस्त वाहनांचे मालक व उपस्थित नागरिकांनी महिला कार चालवत असल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र, पोलिसांनी संजय पवार हे कार चालवत असल्याचे सांगितल्याने अपघातग्रस्तांत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडAccidentअपघात