शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूरच्या व्यावसायिकाला मारहाण करून साताऱ्यात लुटले, साडेतीन लाखांचे दागिने लांबविले

By दत्ता यादव | Updated: July 11, 2023 14:00 IST

प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर 

सातारा : कामानिमित्त साताऱ्यात आलेल्या सिकंदर जगन्नाथ पवार (वय ४३, रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) या व्यावसायिकाला मारहाण करून तिघांनी लुटले. त्यांच्या गळ्यातील सोन्याची पावणेतीन तोळ्यांची चेन, एक तोळ्याची अंगठी, मोबाइल आणि दीड हजारांची रोकड असा सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. राधिका रस्त्यावर ६ जुलैला घडलेली ही धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी समोर आली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, इस्लामपूरचे व्यावसायिक सिकंदर पवार हे ६ जुलैला साताऱ्यात कामानिमित्त आले होते. राधिका रस्त्यावरील पंजाब नॅशनल बॅंकेच्या शेजारील कट्ट्यावर ते थांबले होते. त्यावेळी रात्रीचे साडेदहा वाजले होते. अचानक त्या ठिकाणी तीन तरुण आले. त्यातील एका तरुणाने सिकंदर पवार यांच्या तोंडावर लाथ मारली तर दुसऱ्या व्यक्तीने त्यांचे हात पकडले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील २ लाख ३० हजार रुपये किमतीची पावणेतीन तोळ्यांची चेन आणि एक तोळ्याची सोन्याची अंगठी, मोबाइल आणि दीड हजारांची रोकड त्यांच्याकडून काढून घेतली. 

त्यानंतर तिघे चोरटे तेथून पसार झाले. या घटनेनंतर भयभीत झालेले सिकंदर पवार हे इस्लामपूरला निघून गेले. साताऱ्यात घडलेला प्रकार त्यांनी घरातल्यांना आणि नातेवाइकांना सांगितल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा त्यांचा निर्णय झाला. सोमवारी सायंकाळी ते साताऱ्यात आले. शाहूपुरी पोलिस ठाण्यात येऊन त्यांनी तीन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात तिघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, सहायक फाैजदार बागवान हे अधिक तपास करीत आहेत.सीसीटीव्ही उलगडणार रहस्यइस्लामपूरचे व्यावसायिक सिकंदर पवार यांना मारहाण करणारे तिघेही चोरटे पंजाब नॅशनल बॅंक परिसरात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. त्यामुळे लूटमारीचे रहस्य लवकरच उलगडणार आहे. एकट्या दुकट्या प्रवाशाला अडवून अशा प्रकारे लूटमार केली जात असल्यामुळे अनोळखी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस