शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

माळरानं हिरवाईने नटणार; बांधावर, जमिनीवर बांबू उगवणार!; पावसाळ्यात सातारा जिल्ह्यात बांबू लागवडीला सुरुवात

By नितीन काळेल | Updated: May 17, 2024 19:29 IST

बांबूचा फायदा काय ?.. जाणून घ्या

सातारा : सातारा जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर बांबू लागवड योजना राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांना हेक्टरी ६ लाख ९० हजारांचे अनुदान मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल वाढत असून, कृषी आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत पावसाळ्यात शेतीच्या बांधावर आणि जमिनीवरही ९५२ हेक्टरमध्ये ५ लाख ८५ हजार रोपे लावण्यात येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल. त्याचबरोबर बांबूच्या हिरवाईने माळरानही नटणार आहे.राज्य शासनाने गेल्या वर्षीपासून बांबू लागवडीसाठी नवीन योजना आणली आहे. या अंतर्गत सातारा आणि लातूर या दोन जिल्ह्यांची निवड प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना एक हेक्टरसाठी ६ लाख ९० हजार रुपये अनुदान दिले जात आहे. हे तीन वर्षांसाठी मिळणार आहे. या बांबू लागवडीचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. यामध्ये हे झाड लावल्यानंतर ४० वर्षांपर्यंत उत्पन्न देते. यासाठी पाणीही देण्याची गरज नसते, तसेच बांबूपासून अनेक वस्तू बनतात. बांबूला चांगली बाजारपेठही उपलब्ध आहे. त्यामुळे बांबू लागवडीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणार आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ही बांबू लागवड सुरू आहे. यासाठी शेतकऱ्यांना पैसे देण्याची गरज नाही. आता कृषी आणि सामाजिक वनीकरण विभागानेही बांबू रोपे लागवडीची तयारी केलेली आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर ५ लाख ८५ हजार बांबू रोपे लावण्यात येणार आहेत. शेतीचे बांध आणि जमीन, तसेच माळरानावर ही रोपे लावली जातील. यासाठी १ हजार ३२५ शेतकरी लाभार्थी झालेत.

बांबूचा फायदा काय ?बांबूपासून विविध वस्तू बनविता येतात, तसेच फर्निचरही तयार केले जाते, तर केंद्र शासनाने कंपन्यांत ७ टक्के बायोमास वापरण्याची सूचना केलेली आहे. त्यामुळे बांबू हा त्यासाठी उत्तम पर्याय आहे. यातून शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत, तसेच एकदा बांबूची लागवड केल्यानंतर ४० वर्षे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळणार आहे.

अनुदान तीन वर्षे..

  • लागवडपूर्व कामांसाठी - १,७९,२७२ रुपये
  • प्रथम वर्ष संगोपन - २,१४,६५३
  • द्वितीय वर्ष संगोपन - १,४४,२७४
  • तृतीय वर्ष संगोपन - १,५१,८९०

रोपे देण्यासाठी संस्था..राज्य शासनाने ही योजना सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रोपे देण्यासाठी तीन संस्था तयार करण्यात आलेल्या आहेत. या संस्थेकडून शेतकऱ्यांना बांबूची रोपे मिळत आहेत. यासाठी शासनच कंपन्यांना रोपाचे पैसे देणार आहे. नंतर शेतकऱ्याच्या लाभातून पैसे कमी केले जाणार आहेत.बांबू लागवड नियोजनतालुका - गावे - लाभार्थीसातारा - ८२ - १८१जावळी - ६३ - १०१वाई - ६८ - १८७माण - ६० - १८७खटाव - ६८ - २०८खंडाळा - ३० - ७०फलटण - ७३ - १८२पाटण - ४८ - ९४कोरेगाव - ३६ - ६९कऱ्हाड - ०८ - ३७महाबळेश्वर - ०१ - ०९

सामाजिक वनीकरण आणि कृषी विभागाने पावसाळ्यात बांबू लागवड नियाेजन केलेले आहे. शेतीचे बांध, तसेच माळरानावरही बांबू लागवड करण्यात येईल. यातून शेतकऱ्यांना अर्थप्राप्ती होणार आहे. या पावसाळ्यात जिल्ह्यात ९५२ हेक्टरवर ५ लाख ८५ हजार बांबू रोपे लावण्यात येणार आहेत. - हरिश्चंद्र वाघमोडे, विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी