विज्ञान शाखेला उच्चांकी ९६.८० टक्केचा कट ऑफ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:46 IST2021-09-04T04:46:31+5:302021-09-04T04:46:31+5:30
सातारा : जिल्ह्यातील अकरावी प्रवेशाची दुसरी यादी जाहीर झाली आहे. शहरातील महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेसाठी खुल्या प्रवर्गासाठी सयाजीराव विद्यालयात ९६.८० ...

विज्ञान शाखेला उच्चांकी ९६.८० टक्केचा कट ऑफ!
सातारा : जिल्ह्यातील अकरावी प्रवेशाची दुसरी यादी जाहीर झाली आहे. शहरातील महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेसाठी खुल्या प्रवर्गासाठी सयाजीराव विद्यालयात ९६.८० टक्के तर वायसी कॉलेजला ८९.४० टक्क्यांचे मेरिट लागले आहे.
विज्ञान शाखेत प्रवेशासाठी जोरदार टक्कर सुरू असल्याने काही विद्यार्थ्यांनी अन्य महाविद्यालयात प्रवेश घेण्यापेक्षा वाणिज्य शाखेकडे मोर्चा वळवला आहे. डीजी कॉलेजसाठी ८३.२० टक्के तर सयाजीरावमध्ये ८२.८० टक्क्यांचे मेरिट लागले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया बुधवारअखेर पूर्ण झाल्यानंतर गुरूवार, दि. २ सप्टेंबरला दुसरी कट ऑफ लिस्ट जाहीर करण्यात आली आहे.
कला शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल कमी असल्याने प्रवेश सर्वांसाठी खुले आहेत. जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी पुढील प्रवेश प्रक्रियेनुसार दि. ४ ते ६ सप्टेंबर रोजी दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश शिल्लक असतील तर मूळ कागदपत्रांच्या आधारे प्रवेश देण्यात येणार आहेत.