शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

धरणं गाठतायत तळ; सातारा जिल्ह्यात दुष्काळी झळ

By नितीन काळेल | Updated: February 7, 2024 18:47 IST

उन्हाळा सुरू होत असल्याने पाणी टंचाईची तीव्रता वाढणार

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी अपुरे पर्जन्यमान झाल्याने धरणे भरली नाहीत. प्रमुख सहा प्रकल्पात तर ९५ टीएमसीच पाणीसाठा आहे. तर कण्हेर आणि उरमोडी धरणात ४४ टक्केच पाणी शिल्लक राहिलेले आहे. यामुळे दुष्काळी झळा तीव्र झाल्या असून आगामी काळात संकट आणखी गहिरे होणार आहे.जिल्ह्यात मान्सूनच्या पावसावरच शेती तसेच पिण्याच्या पाण्याचे गणित अवलंबून असते. दरवर्षी जूनपासून सप्टेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ९०० मिलीमीटरच्या आसपास पाऊस पडतो. पण, गेल्यावर्षी पावसाने दगा दिला. वार्षिक सरासरीच्या ७० टक्केच पाऊस झाला. काेणत्याही तालुक्यातील पावसाने वार्षिक सरासही गाठली नाही. त्यामुळे पश्चिम भागातील प्रमुख धरणेही भरली नाहीत. तर पूर्व दुष्काळी भागातील पाणी प्रकल्पातही समाधानकारक साठा झाला नाही. त्यामुळे गेल्यावर्षी आॅक्टोबर महिन्यापासूनच दुष्काळी झळा वाढल्या आहेत. त्यातच आता उन्हाळा सुरू होत असल्याने टंचाईची तीव्रता वाढणार आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी आणि तारळी ही प्रमुख धरणे आहेत. या धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८ टीएमसी आहे. सध्या या धरणांत अवघा ९५.५१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. त्यातील कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. सध्या कोयनेत ७१.२६ टीएमसीच पाणीसाठा राहिला आहे. आगामी पाच महिने हे पाणी पुरवावे लागणार आहे. तर धोम आणि तारळीत चांगला साठा असलातरी आगामी काळात पाणी मागणी वाढणार असल्याने विसर्ग करावा लागणार आहे. सध्या धोम धरणातून ७५० तर कण्हेरमधून १७५ आणि कोयना धरणातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सिंचनासाठी सुरू आहे.

गतवर्षीपेक्षा २५ टीएमसी पाणी कमी..जिल्ह्यातील प्रमुख धरणात सध्यस्थितीत ९५.५१ टीएमसीच पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी तो आतापर्यंत १२० टीएमसी इतका होता. कोयनेत ८६ टीएमसी, धोम ११.३४, कण्हेर ७.५१, उरमोडी ९.१८ आणि तारळीत पाच टीएमसीवर पाणी होते. त्यामुळे गेल्यावर्षी पावसाळ्यापर्यंत टंचाईच्या झळा फारशा जाणवल्या नव्हत्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीdroughtदुष्काळ