फलटणला कोरोनाचे नवे ९५ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:44 IST2021-09-06T04:44:03+5:302021-09-06T04:44:03+5:30
सातारा : आरोग्य विभागाने रविवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात कोरोनाच्या नव्या ९५ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ...

फलटणला कोरोनाचे नवे ९५ रुग्ण
सातारा : आरोग्य विभागाने रविवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात कोरोनाच्या नव्या ९५ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये फलटण शहरातील ९, तर ग्रामीण भागातील ८६ रुग्णांचा समावेश आहे.
बाधित ९५ रुग्णांपैकी ४७ रुग्णांची आरटीपीसीआर, तर ४८ रुग्णांची रॅट चाचणी करण्यात आली. फलटण शहरातील ९, ग्रामीण भागात मुळीकवाडी येथे १०, तरडगाव ५, धुमाळवाडी २, घाडगेवाडी १, खटकेवस्ती १, कोळकी ५, कुसुर १, मठाचीवाडी २, हिंगणगाव २, निंभोरे १, हणमंतवाडी १, पाडेगाव १, पवारवाडी ४, रावडी खुर्द १, सांगवी ३, सोनवडी २, सस्तेवाडी ४, वाठार निंबाळकर १, चौधरवाडी ३, तडवळे १, जाधववाडी २, नांदल २, टाकळवाडा १, आळजापूर १, गोखळी १, ठाकुरकी १, बोडकेवाडी ३, मुंजवडी १, मिरढे २, विठ्ठलवाडी १, विडणी २, जिंती १, फरांदवाडी २, राजाळे २, राजुरी १, शेरेचीवाडी १, साखरवाडी ४, सासवड १, सोमंथळी २, वाखरी १, तर नाईकबोमवाडी येथे कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला आहे.