फलटण तालुक्यात ९३ नवे कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:38 IST2021-04-06T04:38:56+5:302021-04-06T04:38:56+5:30
फलटण : जिल्हा प्रशासनाने सोमवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात ९३ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. ...

फलटण तालुक्यात ९३ नवे कोरोनाबाधित
फलटण : जिल्हा प्रशासनाने सोमवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात ९३ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरातील २२ तर ग्रामीण भागात ७१ रुग्ण सापडले आहेत तर एका बधिताचा मृत्यू झाला आहे.
फलटण शहरात २२ कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये फलटण ७, मंगळवार पेठ १, बुधवार पेठ २, शुक्रवार पेठ ३, रविवार पेठ २, महतपुरापेठ १, लक्ष्मी नगर १, भडकमकर नगर १, मलटण ४ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
ग्रामीण भागात ७१ कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये सासवड ७, जाधववाडी ४, कोळकी ६, मुंजवडी ५, सुरवडी १, विडणी ४, कोऱ्हाळे १, बिबी ४, खुंटे २, कुरवली खु. १, निंभोरे २, सरडे १, वाखरी १, तरडफ ३, दुधेबावी १, साखरवाडी १, जिंती १, तांबवे १, दाते वस्ती १, वाठार निंबाळकर ४, जावळी २, आदर्की १, वेळोशी २, शेरेचीवाडी २, सालपे ४, तरडगाव ३, हिंगणगाव १, पाडेगाव १, बरड १, चव्हाणवाडी १, राजुरी १, तामखडा १ अशा ७१ जणांच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एका बधिताचा मृत्यू
फलटण येथील ६० वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.