सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवे ९० रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:33 IST2021-01-09T04:33:33+5:302021-01-09T04:33:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच असून, शुक्रवारी रात्री नवे ९० रुग्ण आढळून आले. यामुळे ...

90 new corona patients in Satara district | सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवे ९० रुग्ण

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवे ९० रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच असून, शुक्रवारी रात्री नवे ९० रुग्ण आढळून आले. यामुळे बाधितांचा आकडा ५५ हजार १४५ वर पोहोचला आहे.

जिल्ह्यात बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण अधुन-मधून सुरूच असून शुक्रवारी दोघांचा मृत्यू झाला. यामुळे बळींची संख्या १ हजार ७९९ इतकी झाली आहे.

जिल्ह्यात गुरुवारी रात्री ५० जणांचे अहवाल कोरोनाबाधित आले. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पिरवाडी (ता. सातारा) येथील ८० वर्षीय पुरुष आणि दहीवडी, (ता. माण) येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

गत काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्युसत्र आटोक्यात येत असतानाच, अधुन-मधून एक-दोघांचा मृत्यू होतच आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचेही प्रमाण वाढले असून, शुक्रवारी दिवसभरात ५९ जण, तर आतापर्यंत ५२ हजार ५३५ नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तसेच शुक्रवारी ३३७ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

Web Title: 90 new corona patients in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.