शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताकदिनी साताऱ्यात ८० जणांचा आत्मदहनाचा इशारा, पोलिस सतर्क 

By नितीन काळेल | Updated: January 25, 2024 18:30 IST

सातारा : दरवर्षीच प्रजासत्ताकदिनी आंदोलने, आत्मदहन, उपोषणाचा इशारा देण्यात येतो. यावर्षीही तब्बल १३० हून अधिक निवेदने आली आहेत. यामध्ये ...

सातारा : दरवर्षीच प्रजासत्ताकदिनी आंदोलने, आत्मदहन, उपोषणाचा इशारा देण्यात येतो. यावर्षीही तब्बल १३० हून अधिक निवेदने आली आहेत. यामध्ये आत्मदहनासाठीची ८०, उपोषणाची ५० आहेत. यामुळे जिल्ह्यातील प्रशासन अलर्ट मोडवर असलेतरी त्यांची दमछाक होऊ शकते.संस्था, लोकांच्या अनेक मागण्या असतात. या मागण्यांची पूर्तता होण्यासाठी संबंधितांकडून आंदोलन, मोर्चा, उपोषण, आत्मदहनसारखी पावले उचलली जातात. पण, दरवर्षीच स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनादिवशी आंदोलकांची संख्या मोठी असते. यासाठी अगोदरच जिल्हाधिकारी तसेच इतर संबंधित शासकीय कार्यालयात आंदोलनाचे स्वरुप काय असणार आणि मागणी काय याबाबत निवेदन दिले जाते. त्यानंतर प्रशासन काहींशी संपर्क साधून त्यांना आंदोलनापासून परावृत्त करते. तर काहीजण हे आंदोलनावर ठाम असतात. यामुळे दरवर्षीच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन, उपोषणकर्त्यांची संख्या अधिक असते. तसेच जिल्हा परिषदेसह इतर शासकीय कार्यालयाशी संबंधित लोक त्या-त्या कार्यालयापुढे आंदोलन करतात. तरीही जिल्हाधिकारी कार्यालयापुढील आंदोलने अधिक ठरतात. यापार्श्वभूमीवर यावर्षी प्रजासत्ताक दिनाला आत्मदहन, उपोषण, आंदोलन करण्यासाठी जवळपास १३० हून अधिक निवेदने जिल्ह्यातील प्रशासनाकडे आलेली आहे. यामध्ये सर्वाधिक आकडा हा आत्मदहनाचा आहे. तर यातील निवेदन देणारे बहुतांशी सातारा जिल्ह्यातील आहेत.

आंदोलन कोठेही करु शकतात..आंदोलने, उपोषणाबाबत अधिक करुन निवेदने हे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतात. आता प्रजासत्ताक दिनाला आंदोलन, उपोषण आणि आत्मदहनाबाबत १३० हून अधिक निवेदने जिल्ह्यात देण्यात आलेली आहेत. हे आंदोलन साताऱ्यातील शासकीय कार्यालयापुढे होऊ शकते. तसेच तालुका असो किंवा पुणे, मुंबईच्या कार्यालयापुढेही होऊ शकते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRepublic Dayप्रजासत्ताक दिन २०२४Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस