दुकान फोडून आठ लाख लंपास कुडाळमध्ये खळबळ : पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर चोरी
By Admin | Updated: May 13, 2014 23:40 IST2014-05-13T23:39:32+5:302014-05-13T23:40:56+5:30
कुडाळ : जावळी तालुक्यातील कुडाळ येथील सारडा किराणा स्टोअर्सचे शटर चोरट्यांनी कटावणीने उचकटून फोडले. दुकानातील सुमारे आठ

दुकान फोडून आठ लाख लंपास कुडाळमध्ये खळबळ : पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर चोरी
कुडाळ : जावळी तालुक्यातील कुडाळ येथील सारडा किराणा स्टोअर्सचे शटर चोरट्यांनी कटावणीने उचकटून फोडले. दुकानातील सुमारे आठ लाखांची रोकड चोरीस गेली आहे. ही घटना मंगळवारी (दि. १३) सकाळी उघडकीस आली. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर मोठी चोरी झाल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘कुडाळ येथील बाजारपेठेत संतोष सुरेश सारडा यांच्या मालकीची तीनमजली इमारत आहे. यामध्ये तळमजल्यावर त्यांचे ‘सारडा किराणा स्टोअर्स’ हे घाऊक किराणा दुकान आहे, तर वरचे मजले रहिवासासाठी वापरण्यात येतात. व्यापार्यांचे पैसे देण्यासाठी संतोष सारडा यांनी मोठी रक्कम घरी आणून ठेवली होती. ती आणि घरातील काही रक्कम अशी सुमारे आठ लाख रुपयांची रक्कम दुकानातील तिजोरीत ठेवून सोमवारी दुकान बंद केले होते. आज (मंगळवार) सकाळी उठल्यानंतर नेहमीप्रमाणे ते खाली आले असता दुकानाचे शटर कटावणीने वाकवून अर्धवट उघडलेल्या अवस्थेत आढळले. त्यांनी दुकानात जाऊन पाहणी केली असता दुकानातील ड्रॉवर उघडा दिसला. त्यातील संपूर्ण रक्कमही चोरीस गेली होती. घटनेची माहिती मिळताच कुडाळचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण केले. या घटनेची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती. (प्रतिनिधी)