८ तास १३ मिनिटे २१ सेकंद स्थिर राहून विश्व विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:46 IST2021-09-17T04:46:26+5:302021-09-17T04:46:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : साताऱ्याच्या जान्हवी जयप्रकाश इंगळे हिने सुप्त बद्ध कोनासन या आसनमध्ये ८ तास १३ मिनिटे ...

८ तास १३ मिनिटे २१ सेकंद स्थिर राहून विश्व विक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : साताऱ्याच्या जान्हवी जयप्रकाश इंगळे हिने सुप्त बद्ध कोनासन या आसनमध्ये ८ तास १३ मिनिटे २१ सेकंद स्तब्ध, काहीही हालचाल न करता स्थिर राहून तिसरा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. या विश्वविक्रमाची नोंद योगा बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये झाली असून, नुकतेच कुरिअरने गोल्ड मेडल, सर्टिफिकेट, बँच होल्डर, टी-शर्ट, आदी प्राप्त झाले.
जान्हवी या सातारा जिल्ह्यामधून योग विश्वात जागतिक विश्वविक्रम करणाऱ्या पहिल्या युवती आहेत. जान्हवी हिने याआधी सलग ५ तास १ मिनिट १७ सेकंद स्थिर राहून सिद्धासन आसनमध्ये पहिला विश्वविक्रम केला आहे. तसेच मार्च महिन्यामध्ये महिला दिनाचे औचित्य साधून नऊवारी साडीमध्ये १ तास १९ मिनिटे ३४ सेकंदामध्ये दहा हजार वेळा तितली क्रिया करून दुसरा नवा जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित केला. नऊवारी साडीमध्ये योग विश्वात विश्वविक्रम करणाऱ्या पहिल्या युवती आहेत.
जान्हवी या गेली १४ वर्षे योगसाधना करीत असून, त्या आयुष मिनिस्ट्री सर्टिफाईड योगा टिचर आहेत. इंटरनॅशनल आणि काॅर्पोरेट योगा ट्रेनर आहेत. त्याचबरोबर जान्हवी यांनी देशविदेशांतील स्पर्धांमध्ये भाग घेऊन प्रावीण्य मिळविले आहे. ती मॅरेथाॅन रनरही आहे. जान्हवी की योगशालेमार्फत एप्रिल २०२० पासून आजपर्यंत कोरोना काळात सर्वांसाठी आणि कोरोना पेशेंट होम क्वाॅरंटाईन, आयसोलेट पेंशेटसाठी मोफत योगा सेशन घेत असून, याची दखल लंडन बुक ऑफ रेकाॅर्डने घेतली असून, लंडन बुक ऑफ रेकाॅर्डने कमिटमेंट सर्टिफिकेट देऊन गौरव केला आहे.
फोटो आहे.