मोही ग्रामस्थांकडून ७८ सैनिकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:41 IST2021-02-09T04:41:15+5:302021-02-09T04:41:15+5:30
म्हसवड : ‘येथील किरण भगत प्रतिष्ठान, बिलवेश्वर कुस्ती संकुल, समस्त मोही ग्रामस्थ यांच्यावतीने देशसेवा करणाऱ्या आजी-माजी ७८ सैनिकांचा सन्मान ...

मोही ग्रामस्थांकडून ७८ सैनिकांचा सन्मान
म्हसवड : ‘येथील किरण भगत प्रतिष्ठान, बिलवेश्वर कुस्ती संकुल, समस्त मोही ग्रामस्थ यांच्यावतीने देशसेवा करणाऱ्या आजी-माजी ७८ सैनिकांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी गावाने केलेला सन्मान हा राष्ट्रपती पारितोषिकाएवढाच मोठा आहे,’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार दीपकराव तंडेबडवे यांनी काढले.
मोही (ता. माण) येथे आयोजित आजी-माजी सैनिकांच्या सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी क्रीडा असोसिएशनचे वीरभद्र कावडे, वस्ताद महालिंग खांडेकर, देवर्षी भगतमामा, जगन्नाथ फडतरे आदी उपस्थित होते. मोही (ता. माण) येथील महालक्ष्मी मंदिरात झालेल्या या कार्यक्रमास मोहीतील माता-भगिनींसह ग्रामस्थांनी हजेरी लावली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला कॅप्टन विठ्ठलराव देवकर यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
‘मोहीची ललिता बाबर, उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांचा आदर्श तरुण पिढी घेत आहे, तर सैनिकांचा सन्मान हा मोहीकरांचा आदर्श इतर गावांनी घ्यावा,’ असे आवाहन क्रीडा असोसिएशनचे वीरभद्र कावडे यांनी प्रमुख अतिथी म्हणून केले. कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या मोही गावच्या पोलिसांचादेखील सत्कार सन्मान करण्यात आला.
प्रा. बी. के. देवकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. जयप्रकाश देवकर, दादा पाटोळे, दत्ता फौजी, धनाजी फौजी, संजय देवकर, विजय देवकर, वाग्देव मसुगडे, सागर देवकर आदींनी विशेष प्रयत्न केले.
चौकट
यांचाही सन्मान...
१९६२ च्या भारत-पाकिस्तान युद्धात शहीद झालेले मोहीचे सुपुत्र जवान नामदेव सोपान देवकर, १९९९ च्या कारगिल युद्धात शहीद झालेले श्रीकांत जगन्नाथ देवकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मोही गावची पहिली महिला फौजी बानुताई जाधव यांच्या पालकांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी मान्यवरांना विशेष प्रमाणपत्र देऊन सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
फोटो..
08मोही
मोही ग्रामस्थांच्यावतीने देशसेवा करणाऱ्या आजी-माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.