शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

राज्यात ७७६ लाख ८७ क्विंटल साखर उत्पादन!, ४ साखर कारखाने बंद; ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्याकडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 14:20 IST

गाळप, उत्पादन, उताऱ्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर 

संतोष धुमाळपिंपोडे बुद्रुक : राज्यातील ऊस गाळप हंगामाची वाटचाल अंतिम टप्प्याकडे सुरू आहे. सद्य:स्थितीत ७९० लाख ६५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून, सरासरी ९.८३ टक्के सरासरी उताऱ्यानुसार ७७६ लाख ८७ हजार क्विंटल इतके साखरेचे उत्पादन तयार झालेले आहे. चालू वर्षी राज्यात १०३ सहकारी व १०४ खासगी मिळून २०७ कारखान्यांकडून साखर उत्पादन सुरू होते. त्यापैकी ४ साखर कारखाने बंद झाल्याची माहिती साखर आयुक्तालयातील अधिकारी शंकर पवार यांनी दिली.

सद्य:स्थितीत राज्यात ९ लाख ४६ हजार ६५० मेट्रिक टन याप्रमाणे उसाचे रोजचे गाळप होत आहे. चालूवर्षी ऐन पावसाळी हंगामात पर्जन्यमान कमी झाल्याने उसाची किमान वाढ न झाल्याने उसाचे पर्यायाने साखरेचे अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात कारखानदारांकडून उपलब्ध उसाच्या गाळपासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.राज्यात ऊस गाळप, साखर उत्पादन व उताऱ्यात कोल्हापूर विभागाने बाजी मारली आहे. अंतिम टप्प्यात जास्तीत जास्त ऊस गाळप करून अपेक्षित साखर उत्पादन करण्याच्या दृष्टीने ऊसतोडणीचे नियोजन करून कारखान्यांकडून गाळप सुरू आहे.गतवर्ष २०२२-२३ च्या हंगामात १३ फेब्रुवारी अखेर २०७ कारखाने सुरू होते. त्यांनी ८६५ लाख ९६ हजार टनांइतके ऊस गाळप पूर्ण केले होते. तर ९.८३ टक्के सरासरी उताऱ्यानुसार ७७६ लाख ८७ हजार क्विंटल इतके साखर उत्पादन झाले होते. याचा तुलनात्मक विचार करता चालूवर्षी ऊस गाळप संथगतीने सुरू असून, साखर उत्पादनात घट झाल्याचे चित्र आहे.

गाळप, साखर उत्पादन व उताऱ्यात कोल्हापूर विभागाची आघाडी..१३ फेब्रुवारीअखेर प्राप्त आकडेवारीनुसार राज्यात कोल्हापूर विभाग ऊस गाळप, साखर उत्पादन व उताऱ्यात आघाडीवर आहे. कोल्हापूर विभागात ४० कारखान्यांद्वारे १८० लाख ५४ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे, तर सरासरी ११.१७ टक्के उताऱ्यासह २०१ लाख ६५ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन करीत कोल्हापूर विभागाने गाळप, उत्पादन व उताऱ्यात आघाडी घेतली आहे.

पाणीटंचाई व दुष्काळसदृश परिस्थितीमुळे साखर उताऱ्यात पर्यायाने साखर उत्पादनात घट होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अपेक्षित ऊस गाळप करून साखर उत्पादन करण्याचे मोठे आव्हान साखर कारखान्यांपुढे उभे आहे. - जिवाजी मोहिते, कार्यकारी संचालक, गुरू कमॉडिटी (जरंडेश्वर) कारखाना..

राज्यातील विभागनिहाय १३ फेब्रुवारीअखेर ऊस गाळप, साखर उत्पादन व उताराविभाग- ऊस गाळप (लाख मे.टन) - साखर उत्पादन (लाख क्विंटल) - उतारा (टक्के)कोल्हापूर - १८०.५४ - २०१.६५ - ११.१७पुणे - १६९.३२ - १७१.०५ - १०.१सोलापूर - १६८.७८ - १५२.१९ - ९.०२अहमदनगर - ९९.८२ - ९४.९८ - ९.५२छत्रपती संभाजीनगर - ७४.१८ - ६३.०१ - ८.४९नांदेड - ८८.१७ - ८६.०८ - ९.७६अमरावती - ७.३५ - ६.६८ - ९.०९नागपूर - २.४९ - १.२३ - ४.९४.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखानेsugarcaneऊस