शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 १०३ पैकी तब्बल ७६ जणांचे डिपॉझिट निवडणुकीत जप्त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:08 IST

सातारा : सातारा लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबरच क्रांतिसिंह नाना पाटील, किसन वीर आदींनी केले ...

सातारा : सातारा लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबरच क्रांतिसिंह नाना पाटील, किसन वीर आदींनी केले असून, गेल्या १३ निवडणुकींत १०३ उमेदवारांनी निवडणूक लढवून नशीब अजमावले. त्यापैकी तब्बल ७६ जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.१९९५१ मध्ये सातारा उत्तर मतदार संघातून चौघेजण निवडणुकीत उभे राहिले होते. त्यापैकी एकाचे डिपॉझिट जप्त झाले. १९५७ ला सातारा मतदारसंघ झाला, त्यावेळी कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ६५.४२ टक्के मते घेत विजय मिळविला होता. १९६७ ला प्रथमच यशवंतराव चव्हाण हे निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यांच्याविरोधात दोन उमेदवार उभे होते. त्यापैकी एकाचे डिपॉझिट जप्त झाले. १९७१, ७७ आणि ८० च्या लोकसभा निवडणुकीतही चव्हाण यांनी विजय मिळवला. १९८९ च्या निवडणुकीत १३ उमेदवार होते. त्यामध्ये काँग्रेसचे प्रतापराव भोसले यांनी तब्बल ८१.९४ टक्के मते घेत १२ जणांचे डिपॉझिट जप्त केले.२०१४ च्या मोदी लाटेत उदयनराजे भोसले यांच्याह १८ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी १७ जणांचे डिपॉझिट जप्त झाले. निवडणुकीत डिपॉझिट जप्त होणाऱ्यांची ही संख्या सर्वाधिक ठरली.निवडणूक एकूण डिपॉझिटवर्ष उमेदवार जप्त झालेले१९६७ ३ ११९७१ ३ ११९७७ ४ २१९८० ८ ६१९८४ ८ ६१९८९ १३ १२१९९१ १० ८१९९६ १६ १३१९९८ २ ०१९९९ ६ ३२००४ ६ ४२००९ ५ ३२०१४ १९ १७एकूण १०३ ७६डिपॉझिट वाचविण्यासाठी किती मते लागतात?एखाद्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार की नाही, हे त्याला मिळालेली मते आणि एकूण वैध मते यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. कोणत्याही उमेदवाराला एकूण वैध मतांच्या किमान १६ टक्के मते मिळवावी लागतात. तेवढी मिळाली नाही तर त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक