शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

Maharashtra Election 2019 : सातारा लोकसभा आणि विधानसभेसाठी ४८.४५ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 5:25 PM

सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या आठ मतदारसंघांसाठी सोमवारी सकाळी सातपासून मतदानास प्रारंभ झाला. सकाळच्या सुमारास पावसाळी वातावरण असल्याने मतदार अधिक संख्येने बाहेर पडले नव्हते. मात्र, दुपारी तीन वाजेपर्यंत लोकसभेसाठी ४९.५७ टक्के तर विधानसभेसाठी ४५.३६ टक्के असे एकुण ४८.४५ टक्के मतदान झाले. सकाळी ११ पर्यंत जिल्ह्यात ११.१८ टक्के इतके मतदान झाले होते.

ठळक मुद्देसातारा लोकसभा आणि विधानसभेसाठी ४८.४५ टक्के मतदानलोकसभेसाठी ४९.५७ तर विधानसभेसाठी ४५.३६ टक्के मतदान

सातारा : सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या आठ मतदारसंघांसाठी सोमवारी सकाळी सातपासून मतदानास प्रारंभ झाला. सकाळच्या सुमारास पावसाळी वातावरण असल्याने मतदार अधिक संख्येने बाहेर पडले नव्हते. मात्र, दुपारी तीन वाजेपर्यंत लोकसभेसाठी ४९.५७ टक्के तर विधानसभेसाठी ४५.३६ टक्के असे एकुण ४८.४५ टक्के मतदान झाले. सकाळी ११ पर्यंत जिल्ह्यात ११.१८ टक्के इतके मतदान झाले होते.या मतदारसंघातील अनेक उमेदवारांनी सकाळीच कुटुंबासह येऊन मतदान केले. सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या आठ मतदारसंघांसाठी सकाळी सातपासून मतदानास सुरुवात झाली. सकाळी नऊपर्यंत मतदानास फारसा उत्साह नव्हता. तर सकाळी ११ पर्यंत राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले, राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील, सातारा विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रसिंंहराजे भोसले, माण मतदारसंघात ह्यआमचं ठरलंयह्णचे उमेदवार प्रभाकर देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावला.दरम्यान, जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे मतदानावर पावसाचे सावट होते. परंतु सकाळपासून पावसाने उघडीप दिली असलीतरी ढगाळ वातावरण कायम होते. त्यामुळे मतदानाला वेग येईल, अशी अपेक्षा होती. पण मतदानाला फारसा उत्साह कोठे जाणवला नाही.दुपारी तीन वाजेपर्यंत लोकसभेसाठी ९ लाख १७ हजार १८१ मतदारांनी तर विधानसभेसाठी ३ लाख ४७ हजार ७४८ मतदारांनी हक्क बजावला. अकरा वाजेपर्यंत लोकसभेसाठी २ लाख १८ हजार ५१४ तर विधानसभेसाठी २ लाख ७२ हजार १६६ मतदारांनी आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडले.दुपारी तीन वाजेपर्र्यंत वाईमध्ये १ लाख ६१ हजार ३६१, कोरेगावमध्ये १ लाख ५१ हजार ४८९, कºहाड उत्तरमध्ये १ लाख ४९ हजार २0१, कºहाड दक्षिणमध्ये १ लाख ४७ हजार ९३७, पाटणमध्ये १ लाख ५२ हजार ७३0 तर साताऱ्यामध्ये १ लाख ५४ हजार ४६३ मतदारांनी मतदान केले. फलटणमध्ये १ लाख ५४ हजार ३१७ तर माणमध्ये १ लाख ५0 हजार ४३१ मतदारांनी मतदान केले. एकुण १ कोटी २२ लाख १९२९ मतदारांनी मतदान केले.सकाळी नऊ वाजेपर्यंत लोकसभेसाठी ७८ हजार १०६ मतदारांनी तर विधानसभेसाठी १ लाख ३ हजार १२७ मतदारांनी हक्क बजावला. त्यानंतर मतदारांची संख्या वाढत गेली. अकरा वाजेपर्यंत लोकसभेसाठी २ लाख १८ हजार ५१४ तर विधानसभेसाठी २ लाख ७२ हजार १६६ मतदारांनी आपले कर्तव्य पार पाडले.उमेदवारांचे सहपरिवार मतदानमतदारसंघ मोठे असल्याने उमेदवार दिवसभर फिरणार आहेत. त्यामुळे त्यांनी सकाळीच सहपरिवार मतदान केले. उदयनराजे भोसले, श्रीनिवास पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, शंभूराज देसाई आदींनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019satara-acसाताराsatara-pcसातारा