जिल्ह्यात कोरोनाचे नवे ७४ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:20 IST2021-02-05T09:20:38+5:302021-02-05T09:20:38+5:30
सातारा: जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून, गत तीन दिवसांत १६८ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर एकाचा मृत्यू ...

जिल्ह्यात कोरोनाचे नवे ७४ रुग्ण
सातारा: जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून, गत तीन दिवसांत १६८ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची संख्या १ हजार ८१२ वर पोहोचली आहे. तसेच बुधवारी रात्री नवे ७४ रुग्ण आढळून आले असून, बाधितांचा आकडा ५६ हजार २१७ इतका झाला आहे.
जिल्ह्यात गत काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तसेच तपासणीसाठीही रुग्णालयात गर्दी होऊ लागली आहे. सोमवारी रात्री ७० रुग्ण बाधित आढळून आले होते. यामध्ये एकाचाही मृत्यू झाला नाही. तर मंगळवारी रात्री २४ रुग्ण बाधित आढळून आले. यात एकाचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सातारा तालुक्यातील चिंचणेर लिंब येथील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. दरम्यान, बुधवारी दिवसभरात ९३ जणांना घरी सोडण्यात आले. तर आत्तापर्यंत ५३ हजार ६७२ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्याचबरोबर रुग्णालयात तपासणीसाठीही गर्दी होऊ लागली असून, बुधवारी ७५४ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.