‘किसन वीर’साठी ७० टक्के मतदान
By Admin | Updated: May 4, 2015 00:23 IST2015-05-04T00:20:19+5:302015-05-04T00:23:25+5:30
उद्या वाईत होणार मतमोजणी

‘किसन वीर’साठी ७० टक्के मतदान
वाई : भुर्इंज, ता. वाई येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी १३८ केंद्रांवर एकूण ६९.६७ टक्के मतदान झाले़ भुर्इंज गटात सर्वात जास्त म्हणजे ७२ टक्के इतके मतदान झाले आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली़ दरम्यान, मतमोजणी दि. ५ रोजी वाई येथे होणार आहे़
किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी खंडाळा, वाई, जावळी, कोरेगाव, सातारा व महाबळेश्वर या सहा तालुक्यांत एकूण १३८ केंद्रांवर रविवार सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६९.६७ टक्के झाले. भुर्इंज गटात सर्वात जास्त ७२ टक्के मतदान झाले़ कारखान्याची एकूण मतदार संख्या ४३ हजार ९०१ एवढी आहे. सोळा जागांसाठी लढत झाली. (प्रतिनिधी)