जिल्ह्यात कोरोनाचे नवीन ६९ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:09 IST2021-02-05T09:09:55+5:302021-02-05T09:09:55+5:30
सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून सोमवारी नवीन ६९ रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे बाधितांचा आकडा ५६ हजार १२१ ...

जिल्ह्यात कोरोनाचे नवीन ६९ रुग्ण
सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून सोमवारी नवीन ६९ रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे बाधितांचा आकडा ५६ हजार १२१ वर पोहोचला. तर दिवसभरात ९९ जणांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ५३ हजार ५७२ कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात रविवारी रात्री उशिरापर्यंत आलेल्या अहवालानुसार ४० नागरिकांचा अहवाल कोरोनाबाधित आला. यामध्ये सातारा शहराबरोबरच तालुक्यातील जकतावाडी, अतित आदी गावांत नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. पाटण तालुक्यातील मारुल हवेली येथे तर फलटण तालुक्यात अलगुडेवाडी, सुरवडी, साखरवाडी आणि खटाव तालुक्यातील मांडवे, जाखणगाव, निढळ, निमसोड आणि वडूजमध्ये आणखी काही रुग्ण स्पष्ट झाले आहेत.
माण तालुक्यातील पिंगळी, दहिवडी, राजवडी, गोंदवले, शेवरी आदी गावांत तसेच कोरेगाव तालुक्यातील अनपटवाडी आणि खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातही नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत १ हजार ८११ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
चौकट :
१०३७ संशयित...
जिल्ह्यात कोरोना संशयितांचे प्रमाण वाढत आहे. सोमवारी १ हजार ३७ संशयित आढळले. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील ७५, कऱ्हाड २९९, फलटण ५३, कोरेगाव २५, वाई येथील १०९, खंडाळा ६, रायगाव १००, पानमळेवाडी १९५, महाबळेश्वरमधील ५०, म्हसवड ४१, तरडगाव २९ आणि कऱ्हाडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधून ५५ अशा १ हजार ३७ संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती देण्यात आली.
......................................................