जिल्ह्यात ६७.२४ टक्के मतदान

By Admin | Updated: October 16, 2014 00:49 IST2014-10-16T00:20:12+5:302014-10-16T00:49:32+5:30

कऱ्हाड दक्षिण ‘नंबर वन’ : ‘पाटण’ अन् ‘कऱ्हाड दक्षिण’ला धुमशान

67.24 percent polling in the district | जिल्ह्यात ६७.२४ टक्के मतदान

जिल्ह्यात ६७.२४ टक्के मतदान

सातारा : ‘बहुरंगी’ म्हणून गाजलेल्या आणि चुरस निर्माण झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यात सरासरी ६७.२४ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान कऱ्हाड दक्षिणमध्ये, तर त्या खालोखाल मतदान पाटण मतदारसंघात झाले. सातारा शहरात मात्र सगळ््यात कमी मतदान झाले.
जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ असून, सर्वच ठिकाणी बहुरंगी लढती असल्यामुळे हिरीरीने मतदान होईल, अशी अपेक्षा होती. तथापि, मतदानाची टक्केवारी पाहता ती व्यर्थ ठरली. कऱ्हाड दक्षिण मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सातवेळा आमदार झालेले विलासराव पाटील-उंडाळकर यांच्याबरोबरच डॉ. अतुल भोसले यांनीही भाजपकडून रिंगणात उडी घेतल्याने चुरस वाढली होती. या मतदारसंघात ७२.६८ टक्के मतदान झाले.
पाटण मतदारसंघात आमदार विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजितसिंह आणि शंभूराज देसाई यांच्यात चुरशीची लढत आहे. गेल्या काही निवडणुकांत या मतदारसंघात नेहमीच हजार-पाचशेच्या फरकाने विजय नोंदविला गेला आहे. यावेळच्या लढतीकडेही त्याच दृष्टीने पाहिले जात असून, त्यामुळेच पाटण मतदारसंघात चुरशीने ७२ टक्के मतदान झाले.
या दोन मतदारसंघांबरोबरच माण-खटाव, वाई-महाबळेश्वर-खंडाळा आणि कोरेगाव या तीन मतदारसंघांतील लढतीकडेही अनेकांचे माण-खटावमध्ये ६७, वाई-महाबळेश्वर-खंडाळ्यात ६७.२० आणि कोरेगावात ६२.३१ टक्के मतदान झाले. सातारा-जावली मतदारसंघात -६२ टक्के तर कऱ्हाड उत्तर मतदारसंघात ६९.०६ टक्के मतदान झाले.
वाई, माण आणि साताऱ्यात किरकोळ बाचाबाची आणि तणाव वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. (प्रतिनिधी)

वाईत तोडफोड, तर
साताऱ्यात मारहाण
मतदानादरम्यान किरकोळ वादावादी आणि भांडणांमुळे माण, वाई आणि सातारा मतदारसंघांतील मोजक्या केंद्रांवर तणाव निर्माण झाला. वाई मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने राडा झाला. त्यात काही वाहनांचे नुकसान झाले. सातारा शहरातील मंगळवार पेठेत रजनी पवारांच्या पुत्राला मारहाण झाली, तर शहराजवळील कोडोली परिसरात दोन गटांमध्ये बाचाबाचीचा प्रसंग घडला. गोडोली येथेही बोगस मतदानाच्या आरोपावरून वादावादी झाली. माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी येथील केंद्रावरही आक्षेपार्ह मतदानाच्या कारणावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी आमदार जयकुमार गोरे तेथे उपस्थित असल्यामुळे तणावात भर पडली. तारळेजवळील वरची भुडकेवाडी (ता. पाटण) येथे किरकोळ कारणावरून एका मतदाराने मतदानयंत्र उचलून आपटल्याने गोंधळ निर्माण झाला.

Web Title: 67.24 percent polling in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.