शहरात ५५ हजार घरे; अधिकृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:34 IST2021-02-08T04:34:21+5:302021-02-08T04:34:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा शहरातील नळकनेक्शनचा पालिकेकडून सर्व्हे केला जात नसल्याने शहरात अनधिकृत नळधारकांच्या संख्येते दिवसेंदिवस भर ...

शहरात ५५ हजार घरे; अधिकृत
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा शहरातील नळकनेक्शनचा पालिकेकडून सर्व्हे केला जात नसल्याने शहरात अनधिकृत नळधारकांच्या संख्येते दिवसेंदिवस भर पडू लागली आहे. शहरात १६ हजार नळकनेक्शन हे अधिकृत तर सुमारे ७ हजार कनेक्शन अनधिकृत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पालिकेच्या दफ्तरी याची कुठलीही नोंद नाही.
शहराला कास व शहापूर योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. तर काही भागाला जीवन प्राधिकरणकडून पाणीपुरवठा होतो. शहरात तब्बल ३६ हजार मिळकती असून, घरांची संख्या ५५ हजारांहून अधिक आहे. सध्या पालिका व जीवन प्राधिकरणकडून सव्वा लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, अनधिकृत नळधारकांमुळे प्रशासनाला दरवर्षी कोट्यवधींचा फटका बसत आहे. पालिकेच्या दफ्तरी १६ हजार अधिकृत नळकनेक्शनची नोंद आहे. मात्र अनधिकृत नळकनेक्शची नोंदच नाही. अशा नळधारकांची संख्या ७ हजारांंच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पालिकेकडून अशा नळधारकांचा शोधच घेतला जात नसल्याने हा आकडा खरा की खोटा? याबाबत प्रश्नचिन्हच आहे.
त्यामुळे पालिकेने अनधिकत नळधारकांचा सर्व्हे करून असे कनेक्शन अधिकृत करणे क्रमप्राप्त आहे. सध्या पाणीपुरवठा विभागाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील पंंधरा अनधिकृत नळकेनक्शन अधिकृत करण्यात आली आहेत.
(पॉर्इंटर्स)
पाणी कर : ९ कोटी
शहराची लोकसंख्या : १ लाख २० हजार १९५
एकूण घरे : ५५ हजार
अधिकृत नळधारक : १६ हजार
(चौकट)
७ हजार अनधिकृत नळ
सातारा शहरात अनधिकृत नळधारकांची संख्या तब्बल सुमारे सात हजारांच्या घरात आहे. माजगावर माळ, पॉवर हाऊस झोपडपट्टी आदी भागांत अनधिकृत नळधारकांची संख्या सर्वाधिक आहे.
(चौकट)
व्हॉल्व्हमधून गळती सुरूच
सातारा शहराला पालिका व जीवन प्राधिकरणकडून पाणीपुरवठा केला जातो. शहरातील काही जलवाहिन्यांना सातत्याने गळती लागले. मात्र, पालिकेकडून तातडीने दुरुस्ती केली जाते. मात्र, व्हॉल्व्हला लागलेली गळती थांबवात येत नसल्याने पाण्याची नासाडी गेल्या अनेक वर्षांपासून सुरूच आहे. गळतीचे प्रमाण ७.५० टक्के इतके आहे.
(चौकट)
सव्वासात कोटींचा कर थकला
घर व पाणीपट्टी हा पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुुख मार्ग आहे. पाणीपट्टीच्या माध्यमातून पालिकेच्या तिजोरी दरवर्षी सुमारे ९ कोटींचा महसूल जमा होता. आतापर्यंत पावणेदोन कोटींचा कर पालिकेत जमा झाला असून, अजूनही सव्वा सात कोटींचे उद्दिष्ट पालिकेला गाठावयाचे आहे.
(कोट)
पाणीपुवठा विभागाने शहरात सर्व्हे सुरू केला असून, अनधिकृत नळअधिकृत करण्याचे काम हाती घेतले आहे. या मोहिमेमुळे पालिकेच्या महसुलातही वाढ होईल. याशिवाय पाणीगळती रोखण्यासाठी ‘पाणी बचाव’ मोहिमेंतर्गत नळांना तोट्या बसविण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.
- सीता हादगे,
पाणीपुरवठा सभापती
फोटो : ०७ फोटो - ०१/०२/०३/०४/०५/०६