कराड येथे दाखल असणाऱ्या 54 वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 11:23 AM2020-04-11T11:23:48+5:302020-04-11T12:56:40+5:30

कराड येथे दाखल असणाऱ्या ५४ वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्यु झाला.प्राथमिक अंदाजानुसार कोविड-१९ सह श्वसन संस्थेच्या जंतू संसर्गामुळे आणि मधुमेहामुळे त्याचा मृत्यु झाल्याचे सांगितले.

54-year-old Corona Badita, 54, lodged at Karad | कराड येथे दाखल असणाऱ्या 54 वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्यु

कराड येथे दाखल असणाऱ्या 54 वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्यु

Next
ठळक मुद्देकराड येथे दाखल असणाऱ्या 54 वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्यु*कराड ये कोविड-19 सह श्वसन संस्थेच्या जंतू संसर्गामुळे आणि मधुमेहामुळे मृत्यु

सातारा : कृष्णा हॉस्पिटल, कराड दाखल असणाऱ्या 54 वर्षे पुरुष या कोरोना (कोविड-19) बाधित रुग्णांचा आज पहाटे 5 वाजता मृत्यु झाला आहे.

हा रुग्ण मुंबई येथे मत्स्य व्यवसाय करीत होता. तो 21 मार्च रोजी त्याच्या गावी आला. दि.30 मार्च रोजी त्याला खोकल्याचा त्रास सुरु झाला. 5 एप्रिल रोजी कृष्णा हॉस्पिटल, कराड दाखल करण्यात आले.

6 एप्रिल रोजी त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना घेण्यात आला होता व अहवालानुसार दि.7 एप्रिल रोजी हा रुग्ण कोविड-19 बाधित पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.

या कोरोना बाधित 54 वर्षीय पुरुषाचा मृत्यु हा प्राथमिक अंदाजानुसार कोविड-19 सह श्वसन संस्थेच्या जंतू संसर्गामुळे आणि मधुमेहामुळे झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

Web Title: 54-year-old Corona Badita, 54, lodged at Karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.