शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

‘किलकारी’ घेणार ५१ हजार गर्भवती महिलांची काळजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 21:11 IST

आरोग्यविषयक माहिती मिळणार : मातांनाही फायदा; आरोग्य विभागाकडून सुरुवात 

सातारा : केंद्र शासनाने ‘किलकारी’ ही गर्भवती महिला आणि मातांसाठी नवीन योजना सुरू केली असून, सातारा जिल्ह्यातही याला प्रारंभ झाला आहे. या अंतर्गत, या योजनेतून आता जिल्ह्यातील ५१ हजार गर्भवती महिलांची काळजी घेतली जाणार असून, आरोग्यविषयक माहिती मिळणार आहे.

केंद्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘किलकारी’ ही नवीन योजना आणि आशा सेविकांसाठी मोबाइल अकादमी सुरू करण्यात आलेली आहे. महिला व बालकांच्या आरोग्यविषयक विकासासाठी ही योजना आहे. सध्या देशातील १८ राज्यांत ही योजना सुरू आहे. त्यात महाराष्ट्र हे एक राज्य समाविष्ट आहे. ‘किलकारी’ म्हणजे बाळाचे खिदळणे. ही केंद्रीकृत संवादात्मक ध्वनिप्रतिसाद आधारित मोबाइल आरोग्यसेवा आहे.

सातारा जिल्ह्यातही या योजनेला सुरुवात झाली आहे. जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ. महेश खलिपे यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलेला गावातील आशा सेविकेकडे नोंदणी करावी लागणार आहे. यामध्ये नोंदणीकृत गर्भवती महिलेला चाैथ्या आठवड्यापासून बाळ एक वर्षाचे होईपर्यंत औषधे, आहार, लसीकरण, मानसिक आणि शारीरिक स्थिती, आदींबाबत मोबाइलवर मोफत मार्गदर्शन मिळणार आहे; तर सातारा जिल्ह्यात गेल्या वर्षी डिसेंबर महिनाअखेरपर्यंत सुमारे ५१ हजार गर्भवती महिलांची नोंद झालेली अहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

किलकारी म्हणजे बाळाचे खिदळणे. ही केंद्रीकृत संवादात्मक ध्वनिप्रतिसाद आधारित मोबाइल आरोग्यसेवा आहे. सातारा जिल्ह्यातही ही योजना सुरू झाली आहे. याअंतर्गत गर्भवती महिला आणि मातांची काळजी घेतली जाणार आहे. ही योजना माता आणि बालकाच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. तसेच बाळाची कशा प्रकारे काळजी घ्यावी याबाबत मातांमध्ये जागरूकता आणेल.- डाॅ. सुनील चव्हाण, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी

टॅग्स :satara-acसातारा