५०० रुपयांची लाच घेताना पकडले
By Admin | Updated: April 1, 2016 01:01 IST2016-04-01T00:58:32+5:302016-04-01T01:01:32+5:30
परभणी : खंडीत केलेला वीजपुरवठा वीज बिल भरणा केल्यानंतर जोडून देण्यासाठी वीज वितरणच्या कार्यालयातील एका खाजगी इसमाने तक्रारदाराकडून ५०० रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी एसीबीच्या पथकाने कारवाई केली़

५०० रुपयांची लाच घेताना पकडले
परभणी : खंडीत केलेला वीजपुरवठा वीज बिल भरणा केल्यानंतर जोडून देण्यासाठी वीज वितरणच्या कार्यालयातील एका खाजगी इसमाने तक्रारदाराकडून ५०० रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी एसीबीच्या पथकाने कारवाई केली़ यात खाजगी इसमास ३१ मार्च रोजी रंगेहात पकडण्यात आले़
घराच्या मिटरचा खंडीत केलेला वीजपुरवठा तक्रारदाराने वीज बिल भरणा करून जोडण्याची मागणी महावितरणच्या फ्युजकॉल सेंटर ४ कडे केली होती़ हा खंडीत वीजपुरवठा जोडण्यासाठी येथील एका कर्मचाऱ्याने ७०० रुपयांची लाच तक्रारदाराकडे मागितल्याची तक्रार एसीबी कार्यालयात देण्यात आली होती़
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून महावितरण कंपनी कार्यालयात तक्रादाराकडून लाच घेणाऱ्या शेख अझरोद्दीन शेख रहीमोद्दीन काजी या खाजगी व्यक्तीस ५०० रुपयांची लाच घेताना ३१ मार्च रोजी रंगेहाथ पकडले़ या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़ ही कारवाई पोलिस उपअधीक्षक भीमराव शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल गव्हाणकर, विवेकानंद भारती, कर्मचारी लक्ष्मण मुरकुटे, राजू ननवरे, अविनाश पवार, श्रीकांत कदम, सारिका टेहरे, रमेश टाक यांनी केली़ (प्रतिनिधी)