शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात २५ प्रभागांत ५० नगरसेवक!, प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा प्रसिद्ध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 17:02 IST

राजकीय ‘लाभा’ची इच्छुकांकडून चाचपणी

सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या अंतिम प्रभाग रचनेचा नकाशा मंगळवारी सातारा पालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आला. हद्दवाढीनंतरही ही पहिलीच निवडणूक असल्याने यंदा प्रभागांची संख्या २५ झाली असून, यातून ५० नगरसेवक निवडून येणार आहे. प्रभाग रचनेचा हा नकाशा पाहण्यासाठी इच्छुक नगरसेवकांसह नागरिकांची पालिका सभागृहात दिवसभर रेलचेल सुरू होती.सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण कराव्यात, असे आदेश शासनाला दिले आहेत. त्यामुळे स्थानिक संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू झाली आहे. निवडणुकीचा पहिला टप्पा प्रभाग रचनेचा होता. आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील नऊ पालिका व एका नगरपंचायतीकडून हा टप्पा पूर्ण करण्यात आला. शासनाने या प्रभाग रचनेला मान्यता दिल्यानंतर प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा मंगळवारी ज्या-त्या पालिकेत प्रसिद्ध करण्यात आला. हा आराखडा आता लवकरच राजपत्रात प्रसिद्ध केला जाणार आहे.प्रभाग रचना करताना आयोगाच्या निर्देशानुसार नैसर्गिक हद्दींना प्राधान्य देण्यात आले आहे. कोणतीही फाटाफूट न करता, प्रत्येक प्रभागाच्या स्पष्ट सीमा आखण्यात आल्या आहेत. शहरातील इच्छुकांनी आपल्या प्रभागात झालेला वाढीव भागाचा समावेश आणि त्यामुळे मिळणारा राजकीय लाभ याची पालिकेत येऊन कसून चाचपणी केली. पालिकेने २०२२ पूर्वी केलेली प्रभाग रचना व नव्याने झालेली प्रभाग रचना जवळपास एकसारखीच आहे. यात फारसा बदल झालेला नसला, तरी पुढला टप्पा आरक्षण सोडतीचा असणार आहे. त्यामुळे इच्छुकांचे लक्ष या ‘महाखेळा’कडे लागले आहे. ही सोडत कधी निघते? कोणत्या प्रवर्गासाठी कोणते प्रभाग राखीव होतात? याकडे इच्छुकांच्या नजरा लागून आहेत.

हद्दवाढीमुळे वाढले संख्याबळ..सातारा शहराची ८ सप्टेंबर २०२० रोजी हद्दवाढ झाली. दरे, शाहूपुरी, शाहूनगर, गोडोली, विलासपूर, खेडचा काही भाग पालिकेत समाविष्ठ झाला. त्यामुळे सातारा शहराच्या पूर्वीच्या प्रभाग रचनेत बदल झाला असून, प्रभागांची संख्याही २० वरुन २५ इतकी झाली आहे. त्यामुळे यंदा प्रथमच ५० नगरसेवक पालिकेत निवडून जाणार आहेत. हद्दवाढीनंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने ती रंगतदार होणार आहे.

नव्या प्रभाग रचनेचा लेखाजोखा

  • एकूण प्रभाग : २५
  • एकूण सदस्य संख्या : ५०
  • एकूण लोकसंख्या : १,८०,५५६
  • अनुसूचित जाती प्रवर्ग : २१,८००
  • अनुसूचित जमाती प्रवर्ग : २०५७

अनुसूचित प्रवर्गाला प्रथमच संधी..५० टक्के आरक्षणानुसार सातारा पालिकेत २५ महिला व २५ पुरुष उमेदवारांना निवडून द्यावयाचे आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे सहा व एक अनुसूचित जमातीचा उमेदवाराचा समावेश आहे. पालिकेच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच अनुसूचित जमातीचा उमेदवार पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येणार आहे. त्यामुळे यंदा राजकीय समीकरणे बदलू शकतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: 50 Councilors in 25 Wards, Final Ward Structure Published

Web Summary : Satara's municipal elections will have 25 wards with 50 councilors after boundary expansion. The final ward structure is published, drawing considerable interest. This election gives the scheduled tribes a chance for representation.