साताऱ्यात जुगारप्रकरणी ५० जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:51 IST2021-02-25T04:51:58+5:302021-02-25T04:51:58+5:30

सातारा : सातारा शहरातील एका अपार्टमेंटमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मंगळवारी रात्री छापा टाकला. यामध्ये ५० हून अधिक ...

50 arrested in Satara gambling case | साताऱ्यात जुगारप्रकरणी ५० जण ताब्यात

साताऱ्यात जुगारप्रकरणी ५० जण ताब्यात

सातारा : सातारा शहरातील एका अपार्टमेंटमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मंगळवारी रात्री छापा टाकला. यामध्ये ५० हून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे शहरातील ही सर्वात मोठी कारवाई ठरणार असून रात्री उशिरापर्यंत कारवाईची मोहीम सुरूच होती.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी ही कारवाई केली. या कारवाईत ५० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले असून यामध्ये सातारा शहर व बाहेरील लोकांचा समावेश आहे. यामधील काहीजण प्रतिष्ठित असल्याचेही सांगण्यात येत आहे.

या कारवाईत रोख रक्कम, वाहने, दुचाकी, मोबाईल असा लाखो रुपयांचा ऐवज जप्त करण्याचे काम सुरू होते. त्यातच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे या कारवाईत किती जणांवर गुन्हा दाखल झाला व किती मुद्देमाल हस्तगत केला याची माहिती बुधवारी सकाळपर्यंत स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

..................................................

Web Title: 50 arrested in Satara gambling case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.