शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

पावसाचा धोका; साताऱ्यात ४८९ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर 

By नितीन काळेल | Updated: July 24, 2023 19:27 IST

जिल्ह्याच्या पश्चिमेकडील दरडप्रवण गावांत सतर्कता

सातारा : सततचा पाऊस आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क असून दरडप्रवण भागातील ४८९ कुटुंबांना आतापर्यंत स्थलांतरित करण्यात आले आहे. चार दिवसांतच १२० कुटुंबांची यामध्ये वाढ झाली आहे. तर साताऱ्यासह वाई, पाटण, जावळी आणि महाबळेश्वर या पश्चिमेकडील तालुक्यातील हे नागरिक आहेत. त्यांना शाळा, निवारा शेड, मंदिरात ठेवण्यात आलेले आहे.सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात आठ दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यातच २७ जुलैपर्यंत जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे. त्यातच मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी रस्ते खचत असून पूल वाहून गेले आहेत. दरडीही कोसळू लागल्या आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन संवेदनशील ठिकाणच्या नागरिकांचे स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. चार दिवसांपासून जिल्हा प्रशासनाने धोकादायक गावातील कुटुंबांना तात्पुरते स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पश्चिम भागातील पाच तालुक्यातील दरडप्रवण गावातील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. गुरुवारी स्थलांतरित कुटुंबीयांचा आकडा ३६९ झाला होता. तर साेमवारपर्यंत त्यामध्ये आणखी वाढ झाली. सध्या स्थलांतरित कुटुंबांचा आकडा ४८९ झाला आहे. पाऊस आणखी वाढल्यास स्थलांतरित कुटुंबीयांची संख्याही वाढणार आहे.

स्थलांतरित कुटुंबीयांची माहिती तालुका आणि गावे...

सातारा तालुका : मोरेवाडीतील, सांडवालीतील आणि भैरवगड.जावळी : बोंडारवाडी, भुतेघर, नरफदेव, रांजणी आणि धनगरपेढावाई : जोर गाव, गोळेगाव-गोळेवस्तीपाटण : मिरगाव, हुंबरळी, ढोकावळे आणि म्हारवंडमहाबळेश्वर : माचूतर, एरंडल, शिंदोळा, दुधोशी, दरे, चतूरबेट, मालूसर, येर्णे

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसlandslidesभूस्खलन