उदयनराजेंसह ४४ उमेदवारांचे अर्ज दाखल

By Admin | Updated: April 8, 2015 00:35 IST2015-04-08T00:20:30+5:302015-04-08T00:35:03+5:30

३८५ अर्जांची विक्री : वाई, फलटण, सातारा ‘सोसायटी’तील अर्ज आज दाखल होणार

44 candidates filed for Udayan Rajenge | उदयनराजेंसह ४४ उमेदवारांचे अर्ज दाखल

उदयनराजेंसह ४४ उमेदवारांचे अर्ज दाखल

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शंभूराज देसाई, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, आमदार प्रभाकर घार्गे, राजेश पाटील, सुरेंद्र गुदगे, सुनील माने, विद्यमान संचालक राजेंद्र राजपुरे, प्रकाश बडेकर यांच्यासह ४४ उमेदवारांनी ६४ अर्ज दाखल केले. आजअखेर ५७ उमेदवारांनी ८४ अर्ज दाखल केले आहेत.
निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज, बुधवार शेवटचा दिवस आहे. मंगळवारअखेर तब्बल ३८५ अर्जांची विक्री झाली असल्याने शेवटच्या दिवशी प्रमुख मंडळींसह इतर अर्ज मोठ्या संख्येने जमा होण्याची शक्यता आहे. मंगळवारी सोसायटी मतदारसंघातून राजेंद्र राजपुरे (महाबळेश्वर, २ अर्ज), मानसिंग जगदाळे २ अर्ज, दत्तात्रय जाधव, दीपक पाटील, धनंजय पाटील प्रत्येकी १ अर्ज (कऱ्हाड), दिलीप चव्हाण,
शंभूराज देसाई प्रत्येकी १ अर्ज,
विक्रमसिंह पाटणकर ३ अर्ज (पाटण), सुनील माने, श्रीरंग भोईटे प्रत्येकी २ अर्ज, सुरेश गायकवाड, शहाजी भोईटे प्रत्येकी १ अर्ज (कोरेगाव), आमदार प्रभाकर घार्गे ५ अर्ज, नामदेव गोडसे १ अर्ज (खटाव), मनोजकुमार सदाशिव पोळ २ अर्ज, रामचंद्र बापूसाहेब माने १ अर्ज (माण), बकाजीराव पाटील २ अर्ज (खंडाळा) दाखल झाले.
नागरी बँका, पतसंस्था मतदारसंघ : राजेश विलासराव पाटील २ अर्ज, प्रदीप विधाते, सुरेंद्र गुदगे, रामराव लेंभे, नानासो मोरे, भास्करराव गुंडगे, रविराज देसाई प्रत्येकी १ अर्ज. गृहनिर्माण : खासदार उदयनराजे भोसले २ अर्ज, रविराज देसाई १ अर्ज. अनुसूचित जाती-जमाती : प्रकाश बडेकर २ अर्ज, सुरेश गायकवाड, अरुण पवार, बबन भिसे प्रत्येकी १ अर्ज. इतर मागास प्रवर्ग : प्रदीप विधाते, सुरेंद्र गुदगे. भटक्या जमाती : अर्जुन खाडे, भास्करराव गुंडगे २ अर्ज. महिला राखीव : गीतांजली कदम, कांचन साळुंखे प्रत्येकी २ अर्ज, निर्मला चव्हाण, वैशाली फडतरे प्रत्येकी १ अर्ज. औद्योगिक विणकर : अनिल देसाई, विक्रमबाबा पाटणकर प्रत्येकी २ अर्ज, जयवंतराव जंबुरे, रविराज देसाई, जयसिंग जाधव प्रत्येकी १ अर्ज दाखल झाले. दरम्यान, मंगळवारी ८४ अर्जांची विक्री झाली.
दरम्यान, मंगळवारी उदयनराजेंचा अर्ज भरताना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे, सातारा विकास आघाडीचे पक्षप्रतोद अ‍ॅड. डी. जी. बनकर, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, गीतांजली कदम व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उदयनराजेंच्या एका अर्जावर माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांनी सूचक म्हणून, तर सचिन नलावडे यांनी अनुमोदक म्हणून सही केली आहे, तर दुसऱ्या अर्जावर सूचक म्हणून धनंजय बर्गे व अनुमोदक म्हणून धनसिंग कदम यांनी अनुमोदक म्हणून सही केली आहे. दोघेही कोरेगाव तालुक्यातील आहेत. (प्रतिनिधी)

बाळासाहेब पाटलांचा अर्ज ‘कृषी प्रक्रिया’मधून
गत निवडणुकीत कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी पाणीपुरवठा गृहनिर्माण मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता.
या निवडणुकीत मात्र बाळासाहेब पाटील यांनी कृषी उत्पादन प्रक्रिया सहकारी संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. उदयनराजेंनी अर्ज दाखल करण्यासाठी आपला मतदारसंघ कायम ठेवला आहे.

Web Title: 44 candidates filed for Udayan Rajenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.