कऱ्हाड जनताच्या ४२ हजार ठेवीदारांना पैसे मिळणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:39 IST2021-04-01T04:39:42+5:302021-04-01T04:39:42+5:30
दरम्यान, बँकेच्या पाच वर्षांच्या कामकाजाचे लेखा परीक्षणाचे कामही सुरू आहे. त्या परीक्षणाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. शासकीय अधिकाऱ्यांमध्ये ...

कऱ्हाड जनताच्या ४२ हजार ठेवीदारांना पैसे मिळणार!
दरम्यान, बँकेच्या पाच वर्षांच्या कामकाजाचे लेखा परीक्षणाचे कामही सुरू आहे. त्या परीक्षणाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. शासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसत असून, त्याचा फटका बँकेला बसण्याची शक्यता आहे.
कऱ्हाड जनता बँकेच्या विविध ठिकाणच्या शाखा हळूहळू बंद होत आहेत. बँकेचे ३२ हजार २६९ जणांचे सभासदत्व गोठवले आहे. बँकेत ठेवीदारांचे तब्बल ५११ कोटी ३९ लाख, तर १ हजार ७२७ विविध संस्थांच्या ६६ कोटी ९४ हजारांच्या ठेवी आहेत. पाच लाखांपेक्षा कमी ठेवीदारांची संख्या दीड लाख आहे. त्यांच्या तब्बल ४१९ कोटी ४३ लाख ६७ हजाराच्या ठेवी आहेत. त्यापैकी तब्बल ४०० कोटींच्या ठेवी परत मिळण्याचा मार्ग प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे पाठविल्याने मोकळा झाला आहे. बँकेच्या कर्जासह ताळेबंदाचे चाचणी लेखापरीक्षण सुरू आहे. सांगलीचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक किरण पाटील त्याची तपासणी करत आहेत. ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठीचे प्रस्तावांचे काम सुरू आहे. त्यामुळे काही दिवस ते परीक्षण थांबवले आहे, असे अवसायानिक माळी सांगत आहेत. तर लेखापरीक्षण सुरू आहे, असे लेखापरीक्षक पाटील सांगत आहेत. त्यामुळे दोघांमध्येही समन्वय नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यासंदर्भात सभासद आर. जी. पाटील सहकार आयुक्तांकडे तक्रार करणार आहेत.