शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाचा फटका; सातारा जिल्ह्यात ४० हजार हेक्टर क्षेत्र पेरणीविना

By नितीन काळेल | Updated: January 29, 2024 18:48 IST

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याचा फटका खरीपनंतर आता रब्बी पेरणीवर झाला आहे. अवघी ८१ टक्के पेरणी झालेली ...

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याचा फटका खरीपनंतर आता रब्बी पेरणीवर झाला आहे. अवघी ८१ टक्के पेरणी झालेली आहे. तर सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्र पेरणीविना राहिलेले आहे. त्याचबरोबर ज्वारीसह गव्हाच्या क्षेत्रात मोठी घट झालेली आहे.जिल्ह्यातील शेती मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. चांगला पाऊस झाल्यास दोन हंगाम चांगल्यारितीने घेण्यात येतात. त्यातच जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वात मोठा समजला जातो. त्यानंतर रब्बी हंगाम असतो. मात्र, गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले होते. सरासरीच्या ६५ टक्क्यांहून अधिक पाऊस झाला होता. यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पेरणीवर परिणाम झाला. तसेच उत्पादनावरही परिणाम झाला आहे. जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख १३ हजार हेक्टरवर निश्चित करण्यात आले होते. यामध्ये ज्वारीचे सर्वाधिक १ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्र होते. त्यानंतर गव्हाचे ३७ हजार हेक्टर, हरभरा २७ हजार हेक्टरवर होते. या तीन प्रमुख पिकांशिवाय मका, करडई, सूर्यफूल, तीळ, जवस घेणारे शेतकरी आहेत. पण, या पिकांचे क्षेत्र अत्यल्प आहे. जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने रब्बीच्या पेरणीवरही परिणाम झाला आहे.कृषी विभागाच्या अंतिम पेरणी अहवालानुसार ८१.१२ टक्केच पेरणी झालेली आहे. त्यामुळे १ लाख ७२ हजार ९५० हेक्टरवरच पेरणी झालेली आहे. यामध्ये प्रमुख पीक असणाऱ्या ज्वारीची १ लाख ३ हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. ७६ टक्क्यांवर ही पेरणी आहे. तर गव्हाची सुमारे ३३ हजार हेक्टरवर पेर आहे. पेरणीची टक्केवारी ८८ इतकी आहे. हरभऱ्याची ७७ टक्के क्षेत्रावर पेर आहे. म्हणजे, २१ हजार ३३९ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. तसेच मकेला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मका क्षेत्रात वाढ झालेली आहे. कृषी विभागाने १० हजार हेक्टर क्षेत्र निश्चित केले होते. प्रत्यक्षात १४ हजार हेक्टरवर मका घेण्यात आलेली आहे. मकेची पेरणी टक्केवारी १३८ इतकी आहे.गेल्यावर्षी जिल्ह्यात कमी पर्जन्यमान झाले. त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता नाही. दुष्काळी स्थिती असल्याने शेतकऱ्यांनी पाणी उपलब्धततेचा विचार करुन रब्बी हंगाम पेरणी केलेली आहे. तसेच पेरणी होऊनही पिकांना पाणी कमी पडत असल्याने पीक उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.

माण तालुक्यात ६५ टक्केच पेरणी..

जिल्ह्यात सातारा आणि कऱ्हाड तालुक्यातच रब्बी हंगामात १०० टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. साताऱ्यात १५ हजार ४९२ तर कऱ्हाडला सुमारे १५ हजार हेक्टवर रब्बी पिके आहेत. तर सर्वात कमी पेरणी माण तालुक्यात झालेली आहे. ४६ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील ३० हजार हेक्टरवरच पेर झाली. माणमधील पेरणीची टक्केवारी ६५ इतकीच आहे. तर जावळी तालुक्यात ७९ टक्के, पाटण ८८, कोरेगाव ७५, खटाव ७३ टक्के, फलटण ८८, खंडाळा ८०, वाई ८४ आणि महाबळेश्वर तालुक्यात ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.

खरीपात १९ हजार हेक्टर क्षेत्र नापेर..जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या खरीप हंगामावरही दुष्काळी सावट होते. त्यामुळे खरिपाची ९३ टक्केच पेरणी झालेली. त्यामुळे १९ हजार हेक्टर क्षेत्र नापेर राहिले होते. आता रब्बीतही मोठ्या प्रमाणात क्षेत्र पेरणीविना आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी