शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

सातारा: शॉर्ट सर्किटने लागली आग, ओगलेवाडीत ४० एकर ऊस जळून खाक

By प्रमोद सुकरे | Updated: October 28, 2022 17:00 IST

सुमारे ३ तास आगीचे तांडव सुरू होते. ऊस डोळयासमोर जळताना पाहून शेतकऱ्यांच्या जिवाची घालमेल झाली. तर अनेक शेतकऱ्यांना अश्रु अनावर झाले.

कऱ्हाड: ओगलेवाडी (ता.कऱ्हाड) येथे शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत ४३ शेतकऱ्यांचा जवळपास ४० एकर ऊस जळून खाक झाला. काल, गुरूवारी दुपारच्या सुमारास डुबल मळा येथे ही आग लागली. सध्या महसुल विभागाच्यावतीने पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. तर प्रशासनाने जळीत ऊस तातडीने गळीतास न्यावेत तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, टेंभू रोड रेल्वे स्टेशन फाटयाच्या दक्षिण बाजूस डुबल मळा आहे. दुपारच्या सुमारास हणमंत जगताप यांच्या शेतातील विजेच्या खांबावर शॉर्टसर्किट झाल्याने ऊसाला आग लागली. वाऱ्याने ही आग वणवे मळा व गोवारेच्या हद्दीपर्यंत पसरली.  घटनेची माहिती मिळताच कराड नगरपरीषद अग्निशमन विभागाच्या दोन गाडया  घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी उत्तरेकडील आग आटोक्यात आणली. मात्र शेतात मोठया प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने दक्षिण व पश्चिम बाजूकडील आग विझविण्यात अपयश आले. शेवटी ऊसाचे क्षेत्र संपल्यानंतर आपोआप आग विझली. सुमारे ३ तास आगीचे तांडव सुरू होते. वर्ष ते दीड वर्ष सांभाळलेला व वाढवेला ऊस डोळयासमोर जळताना पाहून शेतकऱ्यांच्या जिवाची घालमेल झाली. तर अनेक शेतकऱ्यांना अश्रु अनावर झाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग